राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर-२ ( CSAT )





Saturday, November 19, 2016

Type:Pre

आमचे मित्र आणि मार्गदर्शक श्री.चिंतामण सर (API, ATS ) यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षांचे 2013 ते 2015 सखोल विश्लेषण केले आहे... सरांचा 2014 पासून प्रत्येक पूर्व परीक्षेत दोन्ही पेपर मिळून 200+ स्कोर आहे..विशेषतः CSAT मध्ये 110 + स्कोर आहे.


                                                        C-SAT विस्तृत विश्लेषण         

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2013 च्या राज्यसेवा परीक्षेपासून पूर्वपरीक्षेत C-SAT, CIVIL SERVICES APTITUDE TEST या विषयाचा समावेश केला आहे. यामध्ये आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये आकलन, भाषा आकलन, इंग्रजी व मराठी रीजनिंग, मूलभूत संख्याज्ञान, बुध्दीमापन, माहिती विश्लेषण आणि डिसीजन मेकिंग अशा घटकांचा समावेश आहे.

खरे पाहिल्यास या सर्व घटकांच्या तयारीसाठी विशिष्ट प्रकारचा सामान्य अध्यायन सारखा अभ्यासक्रम नाही. सर्व घटक हे कौशल्यावर आधारित आहेत आणि नियोजित अभ्यास व सरावाद्वारे ही कौशल्ये वृध्दिंगत करुन निश्चित यश प्राप्त करता येते.

वरील प्रश्नांची उत्तरे - या भागावर एकूण 80 प्रश्नांपैकी साधारण: 50 प्रश्न विचारले जातात. या भागाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. व्यावहारीकदृष्ट्या पाहता General Ability व Numerical मध्ये अचूकता जास्त असते व त्यामुळे एकूण गुण मिळण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु एमपीएससीच्या यापूर्वीच्या प्रश्नपत्रिका पाहता आपल्याला असे दिसून येते की आयोगाने General Ability व Numerical ची काठीण्य पातळी वेळोवेळी वाढवलेली आहे. किंबहुना हे प्रश्न सोडवण्यासाठी जास्त वेळ लागेल असेच प्रश्न जास्त प्रमाणात दिसतात. त्यामुळे आपला न्यूमॅरिकलमध्ये जास्त वेळ जाऊन उताऱ्याC) Quantitative Aptitude -  या विभागातील प्रश्न सोडवताना आपण कमी वेळ लागणारे प्रश्न पाहून त्यांना व आपल्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास आहे असे प्रश्न प्रथम सोडवणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रश्नास 2 मिनिटांहून अधिक वेळ देणे आपल्याला शक्य नाही (परवडणारे नाही). C-SAT-2 चा पेपर सोडवताना जास्त गुण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सोठवले जाणे हा अतिशय महत्वपूर्ण निकष ठरतो. त्यामुळे एखादे उत्तर बरोबर आहे किंवा नाही याची पुन्हा पुन:तपासणी करण्यात वेळ घालवू नये. त्याऐवजी जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा.

2) केस स्टडीज सोडवण्याचा दृष्टिकोन

साधारणत: बहुतेक केस स्टडीज ह्या राष्ट्रीय सार्वभौमता (राष्ट्रहीत), प्रामाणिकपणा, नेतृत्वगुण, क्रियाशीलता, समस्या सोडवण्यातील सक्रिय सहभाग (Participation), कार्यतत्परता, समस्ये संदर्भातील सर्व भागधारकांचा विचार करण्याची प्रवृत्ती, मानवी जीवनाचे मूल्य, स्त्रियांचा आत्मसन्मान यासारख्या मुल्यांना तुम्ही किती व कसे महत्व देता हे पडताळून पाहतात.कोणतीही समस्या सोडविताना 

1) राष्ट्रंहीत 2) मानवी जीवन  3) स्त्रियांचा आत्मसन्मान  4) प्रामाणिकपणा (भ्रष्टाचारास थारा न देणे)

या बाबींशी थोडीदेखील तडजोड होता कामा नये.

समस्या सोडविताना त्या समस्येशी संबंधित/बाधीत सर्व घटकांना विचारात/विश्वासात घेणे आवश्यक ठरते. एखादा निर्णय आपणास योग्य वाटतो म्हणून तो लोकांवर न लादता शक्यतो त्यांचे निर्णयाप्रती अनुकूल मत तयार करण्यास प्राधान्य द्यावे व कोणताही निर्णय काही निवडक व्यक्ती अथवा घटकांचा फायदा न पाहता त्या निर्णयामुळे सर्वसाधारण समाजास होणारा लाभ व नुकसान यांचा विचार करावा व असे करताना समाजातील मागास व वंचित घटकांना योग्य न्याय मिळेल याची काळजी घ्यावी. जर केस स्टडी भ्रष्टाचार/गुन्हेगारी यासंबंधात असेल तर याबाबींचे कसल्याही प्रकारे समर्थन असणारे पर्याय निवडू नयेत. तुम्ही कोणत्याही समस्येचा सामना करत असताना स्वत: जबाबदारी घेणे व समस्या समाधानात सक्रिय सहभागी होणे अपेक्षित असते. स्वत:ची जबाबदारी इतरांवर ढकलू नये. सामान्यत: समस्येच्या मुळापर्यंत जाईल व समस्येचे कायमस्वरुपी व दीर्घकालीन समाधान मिळेल अशा उपायांना तात्पुरत्या उपायांच्या तुलनेत अधिक प्राधान्य द्यावे परंतु आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना व मदत कार्यास प्राधान्य द्या. तुम्ही स्वत:च्या निर्णयावर ठाम असावे परंतु दृष्टिकोन लवचीक असावा जेणेकरुन विविध मतमतांतरे असणारे लोक तुमच्या समोर त्यांचा दृष्टिकोन व्यक्त करु शकतील व त्यामुळे समस्येच्या समाधानाचे विविध उपाय उपलब्ध होतील. अशा प्रकारे संघभावनेने घेतलेला निर्णय जास्त परिणामकारक व योग्य पध्दतीने अमलात येऊ शकतो. तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळे होणार्या परिणामांची जबाबदारी स्वत: घेण्याची मानसिक तयारी ठेवावी व निर्णयाच्या दुष्परिणामास तुमच्या सहकार्यांस/अधिनस्थ अधिकाऱ्यास कारणीभूत ठरवू नये.

उताऱ्याबाबत  :-उताऱ्याचे आकलन हा C-SATपेपरचा सर्वात मोठा व सर्वात महत्वाचा भाग आहे.  Language comprehension सहीत एकूण 50 प्रश्न उताऱ्यांवर आधारित असतात. साधारणपणे 7-8 प्रश्न हे इंग्रजी उताऱ्यांवरअसतात. या उताऱ्यांवर भर हा विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेचे आकलन (ज्ञान) तपासण्यावर असतो व त्यांची काठिण्य पातळी ही द्वैभाषिक उतार्यांच्या तुलनेने कमी असते. तसेच 5 प्रश्न हे मराठी उताऱ्यांवरअसतात. उर्वरित 38-40 प्रश्न हे द्वैभाषिक उताऱ्यांवर असतात.  

उताऱ्याच्या आकलनाबाबत खालील बाबींवर भर देणे आवश्यक ठरते. परिक्षेतील उतारे साधारणत: विज्ञान, पर्यावरण, इतिहास, तत्वज्ञान, चालू घडामोडी, वाङ्मय इत्यादी विविध बाबींवर असतात. विज्ञान, पर्यावरण यांसारख्या विषयांवरील उतार्यांचे बहुतेक प्रश्न हे वस्तुनिष्ठ प्रकारचे किंवा तुम्हाला माहित असलेल्या विविध वैज्ञानिक संकल्पना (Scientific Terms) विषयीचे असता व अशा प्रश्नांची उत्तरे अचूक येण्याची शक्यता अधिक असते व हीच बाब चालू घडामोडींवरील उताऱ्यासही लागू पडते. असे उतारे प्राधान्यक्रमाने सोडवावे.

1) प्रश्नपत्रिकेतील प्रश्नपत्रिकेचा रोख हा उताऱ्यातील मुख्य मुद्दे, उताऱ्याचा रोख व उताऱ्यावरुन तुम्ही काय अनुमान काढता हे जाणून घेण्यावर असतो. यासाठी कमीत कमी वेळात तुम्ही उतारा समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. असे करत असतांना कमीत कमी वेळेत उतारा एकदा वाचून घ्यावा व वाचतांना महत्वाचे मुद्दे,Terms (संज्ञा) व तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या माहितीला अधोरेखित करा व बिनमहत्वाच्या वाटणाऱ्या वाक्यांना तुम्ही Strikeout करु शकता. यानंतर उताऱ्यावरील प्रश्न व त्याखाली दिलेले सर्व पर्याय लक्षपूर्वक वाचा. आता ह्या प्रश्न व पर्यायाच्या अनुषंगाने उताऱ्यातील मुद्दे पहा. बर्याच प्रश्नात एकाहून अधिक विधानांबाबत तुम्हाला विचार करावयाचा असतो. त्यामुळे उतारा परत-परत वाचण्याची आवश्यकता येते. अशावेळी तुम्ही अधोरेखित केलेले मुद्दे अतिशय उपयुक्त ठरतात व बिनमहत्वाची माहिती वाचण्यात तुमचा वेळ वाया जात नाही. प्रश्नांची उत्तरे देताना सर्व पर्याय लक्ष देऊन वाचणे आवश्यक असते. बर्याचदा आपल्याला पहिला पर्याय योग्य वाटेल अशा प्रकारचा फसवा असतो व आपण यापुढचे पर्याय न पाहताच उत्तर लिहिल्यास उत्तर चुकण्याची शक्यता असते. शिवाय उताऱ्याच्या अनुषंगाने उत्तरे लिहिताना उताऱ्यात दिलेली माहितीच प्रमाण मानावी व उताऱ्याशी संबंधित तुमच्या माहितीच्या अथवा ज्ञानाचा उपयोग करु नये.

काही विधाने उताऱ्यात दिलेली नसताना परंतु ती उताऱ्या संदर्भात योग्य अनुमान/निष्कर्ष ठरु शकतात. अशी विधाने उताऱ्याच्या संदर्भात संयुक्तिक ठरतात. त्यामुळे उतारा वाचून काढलेला अनुमान महत्वाचा ठरतो. एकदा उतारा वाचल्यानंतर त्यावरील सर्व प्रश्न सोडवावेत व नंतर विचार करण्यासाठी शक्यतो काहीही शिल्लक ठेवू नये. कारण अशा प्रश्नांना परत भेट देतांना तुम्हांला उतारा परत वाचावा लागतो व त्यात बराच वेळ वाया जातो. या वेळेत तुम्ही अन्य प्रश्न सोडवू शकता कारण C-SATमध्ये जास्तीत जास्त प्रश्न Attempt करणे अतिशय आवश्यक ठरते.

उतारे सोडविताना वेळेविरुध्द कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे मानसिक दडपण येणे साहजिक असते. परंतु त्यामुळे तुमचा वेग आणखीनच मंदावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शांतपणे विचार करणे महत्वाचे ठरते. जेणेकरुन तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकाल.

Reasoning / बुध्दीमापन चाचणी  :- आपण 2013,14,15,16 च्या C-SATपेपरमधील बुध्दीमापन, गणित या घटकांचे केले असता प्रत्येक घटकावर पुढीलप्रमाणे विचारल्याचे आपल्याला दिसते.

 

         2013

       2014

       2015


2016

1) गणितीय आकडेमोड

3

1

2

1

2) वेळ-वेग-अंतर     

2

1

1

2

3) प्रमाण      

1

-

-

1

4) कुटप्रश्न     

1

2

2

1

5) नातेसंबंध 

1

-

2

1

6) कोडिंग डिकोडिंग 

5

5

2

2

7) अंक/अक्षर/चिन्ह मालिका 

2

5

4

5

8) नफा-तोटा  

-

1

-

-

10) नॉन व्हर्बल   

1

4

2

3

11) माहिती विश्लेषण 

4

3

3

3

12) वार-तारीख-वर्ष  

-

-

1

1

13) प्रोबॅबीलिटी   

-

-

2

2

14) पायऱ्या  

1

1

1

1

एकूण  

23

25

25

25


वरीलप्रमाणे ढोबळ मानाने वर्गवारी केली आहे. काही प्रश्न वेगवेगळ्या घटकांत येवू शकतात. यावरुन आपल्याला आयोग कोणत्या घटकांवर भर देतो, नेहमी कोणत्या घटकांवर प्रश्न येतात याचा अभ्यास करुन आपण आपल्या तयारीची दिशा ठरवू शकतो. गणितीय आकार-वेग-वेळ-अंतर, विधान-अनुमान-निष्कर्ष,  पायऱ्या, मालिका या घटकांवर 10 ते 12 प्रश्न निश्चितपणे विचारले जातात. हे घटक तुम्हाला खात्रीशीर गुण मिळवून देणारे आहेत. हे प्रश्न सोडवायला वेळदेखील कमी लागतो. फक्त आवश्यकता आहे सातत्यपूर्ण सराव, गुण, कोडिंग, डिकोडिंग यांसारख्या प्रश्नांची उत्तरे लगेच काढता येतात. तर काहींना जास्त वेळ लागतो. अशा प्रश्नांना विशिष्ट काळ प्रयत्न करुन त्यानंतर पुढचे उदाहरण सोडवावे. माहिती विश्लेषणासारख्या काही प्रश्नांना फारच वेळ लागतो. ती उदाहरणे ओळखून शेवटी जेणेकरुन आपणास जास्तीत जास्त प्रश्न सोडविता येतात.

या विभागातील उदाहरणे सोडवताना risk benefit ratio विचारात घ्यावा. उत्तरांचा पडताळा करण्यापेक्षा कमीतकमी स्टेप्सवरुन काढावीत. यात रिस्क आहेच पण तुमचा नियमित सराव असेल तर त्याचा फायदा असा होतो की तुम्ही अशा शॉर्टकट मेथडमधूून बराच वेळ वाचू शकता व तो वेळ आपणांस इतर प्रश्नांना देवून जास्तीत जास्त प्रश्न सोडविता येतात.

SWOT (Strengths, Weakness, Opportunities, Threats) विश्लेषणानुसार आपली Strength ओळखावी त्या घटकांच्या सरावाने गुण जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. जे घटक आणखी सरावाने चांगले होऊ शकतात त्याबाबत सराव करुन Strength याचा सरावावेळी आणि परिक्षेवेळी प्रश्न सोडविण्याचे जर योग्य नियोजन, योग्य क्रम ठेवला तर जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील आणि जास्तीत जास्त गुण प्राप्त करता येतील. 

या घटकावरचे प्रश्न सोडविताना आयोगाचे प्रश्न सोडविण्याच्या ज्या पध्दती दिलेल्या आहेत त्या वेळ वाचविणाऱ्या व खात्रीशीर काढता येणाऱ्या आहेत. याचा सराव निश्चितच फायदेशीर आहे. UPSC च्या प्रश्नांच्या धर्तीवरच MPSC विचारताना दिसते. त्यामुळे UPSC ने विचारलेल्या प्रत्येक घटकाच्या प्रश्नांचा बारकाईने विचार करावा. उदा : MPSC ने विचारलेल्या वेगवेगळ्या रंगाचे चेंडू निवडण्याचा प्रोबॅबीलिटी वरील प्रश्न UPSC  ने 2013 च्या परिक्षेत विचारला आहे.

सराव : परीक्षेत यश मिळविण्यासाठी पेपर सोडविण्याचा सराव ही फार महत्वाची गोष्ट आहे. परीक्षेत ज्या चुका होतात त्यांचा अगोदरच अंदाज घेवून त्या टाळता येवू शकतात. आपण अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने किती योग्य दिशेने चालला आहे याची देखील खात्री करता येते. राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या परिक्षार्थींना सरावाद्वारे स्वत:चे मुल्यांकन करण्याची संधी निश्चितच याद्वारे मिळणार आहे. सराव प्रश्नसंच आयोगाच्या धर्तीवर तेवढीच काठिण्य पातळी असणारे या पुस्तकात दिले आहेत. त्याचा निश्चितच फायदा होईल.

मुल्यांकन : परीक्षेची तयारी करताना सराव प्रश्नपत्रिका सोडून त्याचे मुल्यांकन करणे फारच गरजेचे आहे. सोबत दिलेल्या OMR शीटच्या पाठीमागे मुल्यांकन तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यात दिल्याप्रमाणे सराव परिक्षेतील कामगिरीचे अवलोकन करावे. पहिल्या टेस्टमधील कमजोरी ओळखून त्याचा पुढच्या टेस्टला वेळेत अभ्यास करावा. अशाप्रकारे प्रत्येक सराव परिक्षेतून आपणास आणखी परफेक्शन आणि प्रगतीची संधी घेता येईल. प्रत्येक सरावानंतर अभ्यासाची दिशा ठरवावी. शेवटी अभ्यास आणि सराव यांच्या योग्य संतुलनानेच पूर्वपरिक्षेचा टप्पा लिलया पार करता येईल.

                                                             सर्वसाधारण सूचना 

1) सर्वात महत्वाचे ध्येय म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे झाले पाहिजे. (Attempt maximum possible questions).

2) 2014 व 2015 च्या एमपीएससी व युपीएससी च्या प्रश्नपत्रिका परत सोडवाव्यात व तुमचे कमकुवत घटक व मजबूत घटकांचे स्वत:शीच विश्लेषण करावे. 

3) गणित व Reasoning या मुलभूत बाबी पक्क्या करा. त्यांचा वारंवार सराव करणे हा योग्य मार्ग आहे.

4) दररोज थोडे प्रश्न सोडवा.

5) छोट्या गणना, हिशोब, गणिताची आकडेमोड पेनाचा वापर न करता करण्याचा सराव करा.

6) आयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित प्रश्नपत्रिका 2 तासात सोडवण्याचा वारंवार सराव करा.

-  श्री.अंकुश चिंतामण सर (API, ATS )

 लेखक , CSAT - Simplified Analysis आणि  "शासकीय योजना"

 PSI (२००८) राज्यात प्रथम ,

 राज्यसेवा मुलाखत - २०१२, २०१३,२०१४ 

      

;