Monday, January 30, 2017
मराठी Strategy
राज्यसेवा आणि PSI/STI/ ASO मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा विषय अतिशय महत्वाचा तसेच हक्काचे गुण मिळवून देणारा विषय आहे आणि हा विषयच तुम्हाला अंतिम यादीत निवड होण्यासाठी मैलाचा दगड असेल.म्हणून मराठी या पेपर च्या तयारी संबधी त्याचे विश्लेषण नक्कीच आपणास मार्गदर्शक ठरेल...
अलीकडील काळातील आयोगाच्या मराठी पेपर चे विश्लेषण केले असता प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदलली आहे . त्या अनुषंगाने आपणास अभ्यासाची रणनीती ठरवावी लागेल. मागील काही परीक्षामध्ये मराठीची काठिण्य पातळी थोडी वाढली आहे . प्रश्नामध्ये वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ द्यायचे म्हटले तर दिलेल्या म्हणी साठी समानार्थी म्हण सुद्धा विचारू लागले आहेत त्याचबरोबर सामान्य अध्ययन सारखे बहुपर्यायी प्रश्न विचारले आहेत.याचा आपणास सध्याच्या काळात विचार करावयास हवा...
सदरील लेख हा फक्त आम्ही अभ्यासक्रम आणि त्याची गुणवारी तसेच संदर्भ पुस्तके यासंबंधी देत आहोत.
वर्ष | 2013 | 2014 | 2015 | 2016 | ||||||||
प्रकरण | PSI | STI | ASO | PSI | STI | ASO | PSI | STI | ASO | PSI | STI | ASO |
वर्णविचार | 08 | 06 | 06 | 06 | 05 | 07 | - | 04 | 04 | - | - | 02 |
शब्दविचार | 31 | 17 | 26 | 20 | 25 | 21 | - | 21 | 31 | - | - | 25 |
वाक्यविचार | 10 | 16 | 10 | 14 | 12 | 08 | - | 13 | 08 | - | - | 10 |
आकलन (उतारे) | 05 | 05 | 05 | 05 | 05 | 10 | - | 05 | 05 | - | - | 05 |
शब्दसंग्रह | 06 | 16 | 13 | 15 | 13 | 14 | - | 17 | 12 | - | - | 18 |
एकूण | 60 | 60 | 60 | 60 | 60 | 60 | - | 60 | 60 | - | - | 60 |
भाषा निर्मिती अभ्यासक्रम
वर्ण/अक्षर---------
1) वर्णविचार -
- अ) वर्णमाला
- ब)वर्णांचे प्रकार
- क)वर्ण उच्चार
ड) संधी
शब्द/ पद---------
2)शब्दविचार-
अ) शब्दांच्या जाती
ब)शब्दसिद्धी
क) शब्दशक्ती
ड)समास
वाक्य--------------
3)वाक्यविचार -
अ)वाक्यांचे प्रकार
ब)वाक्यरूपांतर
क) वाक्य संश्लेषण
ड)वाक्यपृथक्करण
इ)प्रयोग
आकलन-----------
4) उतारे
भाषा-------------
5) शब्दसंग्रह
1) समानार्थी शब्द
2) विरुद्धर्थी शब्द
3)शब्दसमूहाबद्दल एक शब्द
4)सारखे भासणारे पण भिन्न
अर्थाचे शब्द
5) अलंकारिक शब्द
6) एकाच शब्दाचे वेगवेगळे
अर्थ
7) वाक्प्रचार
8) म्हणी
9) विरामचिन्हे व शुद्धलेखन
संदर्भ पुस्तके --
1. व्याकरणासाठी-- मो. रा. वाळिंबे
2. शब्दसंग्रहासाठी-- के . सागर & स्टडी सर्कल व सदर पुस्तकात नसणारे शब्द इतर कोणत्याही पुस्तकातून वाचावे.
3. सर्वात महत्वाचे- 1995 पासूनच्या मराठी विषयाच्या आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडविणे.
सविस्तर विश्लेषण :-
Hide quoted text
वर्णविचार :
या प्रकरणाचा अभ्यास करत असताना जास्तीत जास्त तक्ते, क्लुप्त्या तयार करून त्याची नेहमी उजळणी करावी.त्याचबरोबर त्याच्या संक्षिप्त नोट्स तयार कराव्यात.
शब्दविचार:
हा घटक गुण मिळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केले असता असे आढळून येते की दरवर्षी सादर घटकांचे महत्व वाढत आहे .सदर घटकावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.विशेषतः त्यामध्ये शब्दांच्या जाती या घटकावर जास्त भर द्यावा त्याखालोखाल शब्दसिद्धी व समास या घटकावर भर द्यावा.
वाक्यविचार:
वरील दोन घटकांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर सदर घटक अभ्यासण्यासाठी फार सोपा जातो. यामध्ये प्रामुख्याने वाक्यांचे प्रकार हा घटक महत्वाचा आहे.त्यानंतर वाक्य रूपांतर हा घटक अभ्यसावा.
आकलन (उतारे):
आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा विचार करता प्रश्नपत्रिकेत 1 किंवा 2 उतारे, 5 ते 10 गुणासाठी विचारले जातात. सदर घटकामध्ये पैकीच्या पैकी गुण आपण मिळवू शकतो.कारण सदर उताऱ्याची काठिण्य पातळी थोडी सोपी असते.म्हणून या घटकाची तयारी करताना जास्तीत जास्त सराव हा एकमेव पर्याय आहे...
शब्दसंग्रह:
या प्रकरणात म्हणी आणि वाक्यप्रचार यावर जास्त भर दिला पाहिजे. शब्दांची नेहमी उजळणी करत रहावी त्याचबरोबर जास्तीतजास्त शब्दांचा संग्रह विविध पुस्तके यांतून करावा.