Saturday, November 19, 2016
PSI/STI/ASO - Paper 1 , तयारी कशी कराल.
PSI/STI/ASO मुख्य परीक्षा Strategy
PSI/STI/ASO पेपर क्र. 1 Strategy
PSI/STI/ASO ह्या पदांसाठी घेतल्या जाणार्या मुख्य परिक्षेत पेपर क्र. 1 (मराठी व इंग्रजी) हा Merit Deciding Factor आहे. तुलनात्मकदृष्ट्या या पेपरमध्ये स्कोर करणे सोपे आहे. मराठी या विषयात नीट नियोजन केल्यास उत्तम मार्क मिळतात. पण इंग्रजीचे मार्क्स या पेपरमध्ये Score ठरवितात.
(1) मराठी
(i) व्याकरण :
मराठी व्याकरणात शब्दांच्या जातीपासून शब्दसिध्दी, विभक्ती अशा अनेक प्रकरणांचा समावेश होतो.
सुगम मराठी व्याकरण : मो. रा. वाळंबे हे पुस्तक मराठी या विषयासाठी एकमेव उत्तम स्त्रोत आहे. व्याकरणावरील जवळपास 90 ते 95% प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात.
(ii) शब्दसंग्रह, म्हणी व वाक्यप्रचार :
या प्रकरणाची संपूर्ण मराठी K’sagar आणि स्टडी सर्कल - आळवणी हे पुस्तके उत्तम संदर्भ आहेत. तरी काही म्हणी व वाक्यप्रचार ही कुठेच उपलब्ध नसतात. त्यासाठी Discussion आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सराव ह्या दोन्ही बाबी महत्वाच्या ठरतात.
(2)English
इंग्रजी या विषयाचा बहुतेक विद्यार्थी उगाच बाऊ करतात. पण या विषयातील व्याकरणाच्या संकल्पना नीट समजावून घेतल्यास इंग्रजी या विषयात मराठी माध्यमातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवले आहेत.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी English Grammer साठी Wren & Martin ह्या पुस्तकातून व्याकरणाच्या संकल्पना समजून घ्याव्यात आणि Charts च्या स्वरुपात Notes बनवाव्यात.
सध्या ‘Common Error’ या प्रकरणावर भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी English Grammer & Composition पाल व सुरी हे पुस्तक उत्तम स्त्रोत आहे.
English Vocabulary साठी कोणतेही ठराविक पुस्तक न वाचता दररोज इंग्रजी वृत्तपत्रातील अवघड शब्दांचे अर्थ Synoyms (समानार्थी) & Antonyms (विरुध्दार्थी) Oxford मराठी-इंग्रजी डिक्शनरी या पुस्तकातून एकत्रित करावेत.
पेपर क्र. 1 साठी मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे पूर्ण अवलोकन करावे व त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेला कोणताही एक मुख्य परिक्षा Planner हे उपयुक्त ठरतात.