राज्यसेवा GS-4





Saturday, November 19, 2016

Type:Main

राज्यसेवा GS-4, तयारी कशी कराल.


राज्यसेवा GS - IV (Strategy)

अर्थशास्त्र आणि विज्ञान व तंत्रज्ञान

भाग 1: अर्थशास्त्र

राज्यसेवा मुख्य परीक्षेत GS4 हा महत्वपूर्ण व पूर्णत: संकल्पनात्मक विषय आहे. या विषयामध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी अर्थशास्त्रातील मुळ संकल्पना, अद्ययावत आकडेवारी आणि आर्थिक पाहणी अहवाल यासारखे शासकीय दस्तऐवज यांचा सविस्तर अभ्यास करणे महत्वाचे ठरते.

GS4 मध्ये अर्थशास्त्र या विषयावर जवळपास 110 प्रश्न विचारले जातात. मागील चार वर्षाचे अभ्यासक्रमातील प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नांचे अशाप्रकारे वर्गीकरण करता येईल.

भाग 1

Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

भारतीय अर्थव्यवस्था

04

09

07

02

2)

पायाभूत सुविधांचा विकास

10

08

01

06

3)

उद्योग

07

06

03

14

4)

सहकार

05

02

04

03

5)

आर्थिक सुधारणा

07

02

05

05

6)

आंतरराष्ट्रीय व्यापार

11

01

11

10

7)

गरिबांचे निर्देशांकन

06

03

11

04

8)

रोजगार

03

02

05

04

9)

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

02

03

03

04

भाग 2

Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

समष्टी अर्थशास्त्र

06

06

08

04

2)

सार्वजनिक वित्त

08

14

13

08

3)

वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थ.

09

09

08

15

4)

भारतीय कृषीव्यवस्था

10

14

12

12

5)

कृषिचे महत्व व कर्जबाजारीपणा

12

08

13

12

6)

अन्न व पोषण आहार

09

08

04

07

7)

भारतीय उद्योग व सेवाक्षेत्र

01

01

02

-


Sr.No

Pattern

2012

2013

2014

2015

1)

One Liner

67

50

47

30

2)

Two Liner

-

04

16

30

3)

Multiple

43

48

45

42

4)

Match the Pairs

-

05

02

08


विस्तृत विश्लेषण

भाग 1

प्रकरण 1.1 भारतीय अर्थव्यवस्था

या प्रकरणासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम NCERT-11 वी “Indian Economic Development” हे पुस्तक आणि सर्व संकल्पना मुलत: नीट समजून घ्याव्यात व तसेच पंचवार्षिक योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करावा.

प्रकरण 1.2 पायाभुत सुविधांचा विकास

पायाभूत सुविधा (वीज, रस्ते, पाणी, ऊर्जा, वाहतूक, दळणवळणाच्या सुविधा) इ. साठी सर्वप्रथम भारत सरकारचे Indian Year Book 2016 या पुस्तकातून Short Notes काढाव्यात आणि त्याला देसले सरांचे पुस्तक अर्थशास्त्र भाग 1 याची जोड द्यावी. याबरोबरच Mrunal.org या संकेतस्थळावरील अर्थशास्त्राचे videos अतिशय उपयुक्त ठरतात.

प्रकरण 1.3 आणि 2.7 उद्योग

या प्रकरणासाठी भारतीय अर्थव्यवस्था दत्त आणि सुंदरम या पुस्तकातील उद्योग प्रकरण आणि संबंधित मंत्रालयाच्या Websites यांचा अभ्यास करावा. तसेच उद्योगातील आजारीपण आणि लघूउद्योग मुद्यावर विशेष भर द्यावा.

प्रकरण 1.4 सहकार

सहकार हे प्रकरण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे 11वी आणि 12वी चे (फक्त मर्यादित प्रकरणे) परिपूर्ण आहेत.

प्रकरण 1.5 आर्थिक सुधारणा

आर्थिक सुधारणा मधील ‘खा’ - ‘उ’ - ‘जा’ या धोरणांचा अभ्यास NCERT 11 वी या पुस्तकातून करावा आणि अद्ययावत माहितीसाठी WTO ची Website व देसले यांचे पुस्तक हाताळावे.

प्रकरण 1.6 आंतरराष्ट्रीय व्यापार

या प्रकरणातील आंतरराष्ट्रीय संस्था IMF, World Bank इत्यादी यांचे संकेतस्थळे नवीन घडलेल्या परिषदा आणि चालू आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण यांचा प्रथम अभ्यास करावा. त्याबरोबरच देसले/कोळंबे - अर्थशास्त्र या पुस्तकातून सविस्तर अभ्यास करावा.

प्रकरण 1.7 गरिबांचे निर्देशांकन

या प्रकरणावरील आकडेवारी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी प्रतियोगिता दर्पण Special Issue याचा आधार घ्यावा आणि त्याबरोबरच रंगराजन समितीचा अहवाल यांचा पुरक अभ्यास करावा.

प्रकरण 1.8 रोजगार

या प्रकरणावर 4 ते 5 प्रश्न विचारले जात असून त्यासाठी दत्त आणि सुंदरम यातील बेरोजगारी हे प्रकरण पुरेसे आहे.

प्रकरण 1.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

या प्रकरणावर सर्वात कमी प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी (Latest) अतिशय उपयुक्त ठरते.

भाग 2

प्रकरण 2.1 समष्टी अर्थशास्त्र

या प्रकरणातील सर्व मुद्द्यांचा NCERT 12 वी ची अर्थशास्त्रावरील पुस्तके किंवा देसले सरांचे पुस्तक यात सविस्तर आढावा दिलेला आहे. विशेषत: पैसागुणक, आधार पैसा चलनवाढ नियंत्रण इ. संकल्पना नीट समजून घ्याव्यात.

प्रकरण 2.2 सार्वजनिक वित्तव्यवस्थ

या प्रकरणासाठी सर्वप्रथम दत्त आणि सुंदरम यातील सार्वजनिक वित्त हे प्रकरण पूर्ण अभ्यासावे आणि त्यासोबत mrunal.org या Website वरील Public Finance चे Video उपयुक्त ठरतात.

प्रकरण 2.3 वाढ, विकास व आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था

या प्रकरणातील बहुतांश मुद्दे आर्थिक पाहणी अहवाल आणि कोळंबे / देसले सरांच्या पुस्तकात अंतर्भूत आहेत. या प्रकरणावर जवळपास 10 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे व्यवस्थित व रचनात्मक अभ्यास केल्यास या प्रकरणावरील सर्व प्रश्न सोडविले जाऊ शकतात.

प्रकरण 2.4 आणि 2.5, 2.6 भारतीय कृषिव्यवस्था पोषण आहार

कृषि हा घटक GS1 या प्रमाणेच GS4 या पेपरमध्ये सुध्दा महत्वाचा ठरतो. अर्थशास्त्रातील कृषिचे महत्व अनन्यसाधारण असून कृषिच्या मूळ संकल्पना जमिनीची उत्पादकता, जल व्यवस्थापन, WTO आणि कृषिक्षेत्र अशा विविध घटकांचा समावेश या प्रकरणात होतो.

सर्वप्रथम कृषि या प्रकरणासाठी ‘भारतीय अर्थव्यवस्था’ दत्त आणि सुंदरम यातील कृषिविषयक सर्वच घटक यांचा सविस्तर अभ्यास करावा व त्यातील दिलेल्या अनेक तक्त्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास हे प्रकरण निश्चितच चांगले गुण मिळवून देऊ शकते. वरील पुस्तकाबरोबरच कृषिमंत्रालय, ग्राहक मंत्रालय यांच्या Website चा सखोल अभ्यास करावा.

पोषण आहारातील सर्व मुद्दे यासाठी Internet चा आधार घेणे फायदेशीर ठरते. तसेच (National Institute of Nutrition) यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करावा.

भाग 2 - विज्ञान आणि तंत्रज्ञान

पेपर क्र. 4 मधील ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा विषय काहीसा संकल्पनात्मक व काहीसा Factual आहे. संकल्पना नीट समजून घेतल्यास या विषयाचा नक्कीच स्कोर वाढू शकतो. ह्या विषयाची सध्यातरी मराठी माध्यमात चांगली पुस्तके उपलब्ध नसल्याने काही प्रकरणासाठी Website आणि इंग्रजी माध्यमातील पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो.

GS 4 मध्ये या भागावर जवळपास 40 प्रश्न विचारले जातात. मागील 4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे निरीक्षण केल्यास प्रत्येक प्रकरणानुसार खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल.


Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

ऊर्जा

01

07

04

07

2)

संगणक व माहिती तंत्रज्ञान

05

04

05

05

3)

अवकाश तंत्रज्ञान

07

06

04

05

4)

जैवतंत्रज्ञान

15

15

14

12

5)

आण्विक तंत्रज्ञान

07

02

07

05

6)

आपत्ती व्यवस्थापन

05

06

06

05

 

Sr.No

Pattern

2012

2013

2014

2015

1)

One Liner

23

26

23

25

2)

Two Liner

01

-

12

11

3)

Multiple

15

14

05

03

4)

Match the Pairs

02

-

-

01


भाग 3

जैवतंत्रज्ञान (Biotechnology)

जैवतंत्रज्ञान या विभागासाठी सर्वप्रथम 12वी Biology या पुस्तकातून अभ्यासक्रमातील सर्व मुद्यांचा सविस्तर अभ्यास करावा. त्यानंतर Wizard Publication चे Science & Tech किंवा Vajiram & Ravi याच्या पुस्तकातून फक्त अभ्यासक्रमांशी निगडीत मुद्यांचा पुरक आधार घ्यावा. भाग -3 मधील या प्रकरणावर दरवर्षी 20 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जैवतंत्रज्ञानातील जवळपास सर्व संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

ऊर्जा (Energy)

ऊर्जा हे प्रकरण सर्वप्रथम India Year Book मधून सखोल वाचावे आणि अद्ययावत माहितीसाठी ऊर्जामंत्रालयाची Website नवीन आणि पुर्ननवीकरण मंत्रालयाची Website (Ministry of New And Renewable) यांचा आधार घ्यावा तसेच Bureau of Energy Efficiency या संस्थेच्या नामांकनाचा अभ्यास करावा.

आण्विक तंत्रज्ञान (Nuclear Technology)

हे प्रकरण कमी वेळात जास्त गुण मिळवून देणारे आहे यासाठी सर्वप्रथम अणू ऊर्जा मंत्रालयाची Website (dae.nic.in) पूर्ण पाहून घ्यावी आणि सोबत कोळंबे सरांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकातील आण्विक तंत्रज्ञान प्रकरण अभ्यासावे.

अवकाश तंत्रज्ञान (Space Technology)

अवकाश तंत्रज्ञान या प्रकरणावरील बहुतेक प्रश्न सोपे व वस्तुनिष्ठ असतात त्यासाठी ISRO ची Website पूर्ण अभ्यासावी व Notes काढताना IRS आणि INSAT तसेच PSLV आणि GSLV असा तुलनात्मक अभ्यास करावा. संकेतस्थळाबरोबरच कोळंबे- विज्ञान व तंत्रज्ञान यातून मुलभूत संकल्पना समजून घ्याव्यात.

संगणक तंत्रज्ञान (Computer Technology)

हे प्रकरण ज्या विद्यार्थ्यांची संगणक विषयात पदवी झाली आहे यांना सोपे जाते पण इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम MS-CIT चे Basic पुस्तक वाचावे व त्यातील मुलभूत संकल्पना समजून घ्याव्यात. त्याबरोबरच राज्यसेवा मुख्यपरिक्षेतील तसेच PSI/STI/ASO याच्या मुख्य परिक्षेतील संगणक विषयावरील मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)

या प्रकरणातील सर्व मुद्दे (उदा. भुकंप, दहशतवादी हल्ले इतर नैसर्गिक आपत्ती) यांचा घटनाक्रमानुसार अभ्यास करावा. यासाठी Wikipedia आणि Internet हे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. त्यानंतरच NCERT 11 वी Physical Geography या पुस्तकातील Disaster Management या प्रकरणाचा अभ्यास करावा.

;