PSI/STI/ASO





Saturday, November 19, 2016

Type:Pre

STI/PSI/ASO पूर्व परीक्षा तयारी कशी कराल.



STI/PSI/ASO पूर्व परीक्षा Strategy

विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित या सर्व पदांच्या नियुक्तीत पूर्व परीक्षा हा महत्वाचा टप्पा आहे.

1) प्रथमत: पूर्व परीक्षा अभ्यासक्रमाचे नीट अवलोकन करावे आणि त्याच बरोबर मागील 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वत: विश्लेषण करावे जेणेकरुन आयोगाचा पॅटर्न आपणास लक्षात येईल. 

2) गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.


विषयानुसार Strategy आणि Book-list (पुस्तकसूची) :-

(I)इतिहास


इतिहास ह्या विषयासाठी सध्यातरी वाचन जास्त आणि Output कमी येत आहे. तरीपण मुख्य परिक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.

पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार इतिहास ह्या विषयातील आधुनिक भारत या प्रकरणासाठी ग्रोव्हर आणि बेल्हेकर आणि बिपन चंद्रा यांची पुस्तके वाचावीत.

या विषयात महाराष्ट्राच्या इतिहासावर बरेच प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अनिल कटारे यांचे पुस्तक पुरेसे ठरते.


(II)भूगोल

भूगोल ह्या विषयात संकल्पना व Factual Data यांचा संगम आढळतो. पण योग्य नियोजन व रचनात्मक अभ्यास केल्यास निश्चितच जास्त गुण मिळतात.

भूगोल हा विषय 3 विभागात वर्गीकृत केला जाऊ शकतो.

(I) प्राकृतिक

(II) मानवी व सामाजिक 

(III) आर्थिक

ह्या तिन्ही विभागांचे जग, भारत आणि महाराष्ट्र असे पुन्हा वर्गीकरण करता येईल.


(1) प्राकृतिक भूगोल (जगाचा)

या प्रकरणासाठी NCERT 11 वी आणि 12वी तसेच महाराष्ट्र राज्याची 11वी, 12वी क्रमीक पुस्तके ही उत्तम स्त्रोत आहेत. 

(2) भारताचा भूगोल

या प्रकरणाची NCERT व राज्य शासनाच्या क्रमीक पुस्तकांबरोबरच ए. बी. सवदी सरांचे पुस्तक सर्वोत्तम संदर्भ ठरतात. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी नकाशांचा (Atlas) पुरेपूर वापर करावा. काही प्रकरणासाठी स्वतंत्र Flow Charts काढल्यास Revision करताना निश्चितच फायदा होतो. 

(3) महाराष्ट्राचा भूगोल

या प्रकरणासाठी राज्य शासनाची पुस्तके व महाराष्ट्राचा भूगोल खतीब (K’sagar) ही पुस्तके पुरेसी आहेत. अभ्यासक्रमातील विविध मुद्यांसाठी ए. बी. सवदी सरांचे ‘महाराष्ट्राचा प्रगत Atlas’ ह्या पुस्तकांचा आधार घेतल्यास निश्चितच फायदा होतो. 


(III) भारतीय राज्यघटना व पंचायतराज

Polity हा विषय कमी वेळात जास्त गुण मिळवून देणारा आहे. GS मधील इतर विषयांशी तुलना करता संकल्पना नीट समजल्या असल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतात.

या विषयासाठी सर्वप्रथम M. Laxmikant  किंवा कोळंबे सरांचे पुस्तक उत्तम स्त्रोत आहे. पण काही मुद्यांसाठी ‘”आपली संसद - सुभाष कश्यप” ह्या पुस्तकाचा आधार घ्यावा.

पंचायतराज हे प्रकरण YCMOU (मुक्त विद्यापीठ) च्या पुस्तकांतून पूर्णपणे वाचून त्यावर Charts च्या रुपात तुलनात्मक notes काढाव्यात.


(IV) सामान्य विज्ञान

सामान्य विज्ञान हा विषय काही विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना अवघड जातो असा गैरसमज आहे पण आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नाचे व्यवस्थित विश्लेषण केल्यास व अवघड संकल्पना Discussion द्वारे नीट समजून घेतल्यास ह्या विषयात निश्चितच चांगले मार्क्स मिळतात.

या विषयासाठी NCERT व राज्य शासनाची क्रमीक पुस्तके ही उत्तम संदर्भ आहेत. त्याबरोबरच Lucent सामान्य विज्ञान हे पुस्तक पुरेसे आहे. मानवी आरोग्यशास्त्रासाठी डॉ. विशाल माने यांचे विज्ञानाचे पुस्तक उपयुक्त आहे.


(V) अर्थशास्त्र

हा विषय पूर्णत: संकल्पनात्मक आहे. त्यासाठी प्रथमत: विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची 9वी, 10 वी ही पुस्तके व NCERT -  11 वी चे ‘Indian Economic Development’  हे पुस्तक उत्तम पाया ठरतात. त्यानंतरच कोळंबे किंवा देसले सरांचे पुस्तक अभ्यासावे. सर्व प्रकरणाच्या स्वत: हस्तलिखित Notes काढाव्यात.

Factual आणि Latest Data साठी प्रतियोगिता दर्पण Economics Special Issue हे कमी वेळात उत्तम गुण मिळवून देते.


(VI) चालू घडामोडी



चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास दररोज केेल्यासच परिक्षेत उत्तम गुण मिळतील. या विषयासाठी सकाळ, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स सारखी वृत्तपत्रे, PIB (Press Information Bureau) चे App किंवा  Website व लोकराज्य सारखी मासिके उत्तम स्त्रोत आहेत.

विद्यार्थ्यांनी नियमित चालू घडामोडीतील प्रत्येक विभाग - राजकीय, सामाजिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रिडा, व्यक्तीविशेष आणि पुरस्कार स्वतंत्र Notes काढाव्यात. याबरोबरच चालू घडामोडी या विषयासाठी - सकाळ current updates आणि पृथ्वी / युनिक इत्यादी. कोणतेही एक मासिक वाचायला हरकत नाही.


परीक्षेला कमी वेळ असताना विविध प्रकाशनाची मासिके उपयुक्त ठरतात पण स्वत:च्या हस्तलिखित Notes कधीपण इतरांपेक्षा सरस ठरतात.



(VII) बुद्धिमत्ता चाचणी:

या विषयात दररोज सराव केल्यास निश्चितच चांगले गुण मिळतात. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वा. ना. दांडेकर सारखी पुस्तके अभ्यासल्यानंतरच R . S Agarwal यांची पुस्तके वापरावीत.


;