Saturday, November 19, 2016
राज्यसेवा GS-1, तयारी कशी कराल.
इतिहास
Sr. no.प्रकरण 2013 2014 2015 2016
1.आधुनिक भारत (विशेषतः महाराष्ट्र) (1818-1957) 5 6 1 5
2.ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (१७५७-१८५७) 3 6 5 4
3.सामाजिक सांस्कृतिक बदल -भारतातील प्रमुख समाज/ चळवळी 10 14 14 6
4.सामाजिक व आर्थिक जागृती (१८५७-१९४७) 6 10 04
5.भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती 6 5 5 5
6.गांधी युग (१९१५- १९४८) 13 11 6 4
7.स्वातंत्रोत्तर भारत (१९४७- सद्यस्थिती) 5 7 16 7
8.महाराष्ट्रातील समाजसुधारक 6 9 6 17
9.महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा- प्राचीन ते आधुनिक 5 1 2 3
Sr. no. Pattern 2013 2014 2015 2016
1.एका वाक्यात प्रश्न 30 20 11 31
2.दोन पर्यायी प्रश्न 4 10 18
3.बहुपर्यायी प्रश्न 10 25 13 7
4.एक वाक्य- चार पर्याय प्रश्न 10 6 14 4
5.जोड्या लावा 1 2 5 10
मुख्य आणि पूर्व दोन्ही परीक्षांचा प्रकार हा बहुपर्यायीच आहे. मुख्य परीक्षेत अजून थोडे खोलात जाऊन तपशीलवार अभ्यास पाहिजे. जर विश्लेषण पहिले तर १.३ सामाजिक- सांस्कृतिक बदल आणि १.६ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ यावर अनुक्रमे १०-१४ आणि ६-१३ प्रश्न विचारले आहेत. २०१५ मध्ये स्वातंत्रोत्तर भारतावर अचानक बदल होत १६ प्रश्न आहेत, बाकी उपघटकांवर ५-६ प्रश्न आहेत. याचा अर्थ कोणताही घटक वगळून चालणार नाही. अभ्यासक्रमध्ये जरी १.१ आधुनिक भारताचा इतिहास (१८५७-१९४७) लिहले असले तरी, सतराव्या शतकापासून म्हणजे १६०० सनापासून विविध यूरोपीय राष्ट्रांची भारतावर कशी सत्ता स्थापन झाली याचा अभ्यास हवा.
एका वाक्यात प्रश्न विचारण्याचे प्रमाण २०-३० वरून २०१५ मध्ये ११ वर आले, तर दोन वाक्यातील प्रश्नांची संख्या १४ वरून १८ झाली. एक प्रश्न आणि त्याखाली चार वाक्य, आणि बहुपर्यायी प्रश्नांची संख्या वाढली आहे. यावरून विद्यार्थ्याला प्रश्न वाचणे, विचार करणे, समजला नाही तर पुन्हा वाचणे यामध्ये वेळ लागू शकतो. परिणामी दिलेल्या वेळेत पेपर संपूर्ण सोडवून होत नाही. इतिहासात काही प्रश्न अगदीच हटके असतात, ते कुठून आले हेही कळत नाही, पण अशा प्रश्नांची संख्या एक-दोन असते त्यामुळे त्यावर जास्त विचार करण्यापेक्षा संदर्भग्रंथा मध्ये जी पुस्तके आहेत त्यांचा सराव करावा.
अभ्यास करताना अजून एक गोष्ट लक्षात आली कि, ज्यांना जे क्रांतिकारक आवडतात ते दुसऱ्या पात्रांकडे कमी लक्ष देऊन वाचतात. गांधीजी, नेहरू यांच्या बद्दल आकस असण्याचा काहीच संबंध नाही. या दोघांचा जरी विस्तारित रूपात अभयास केला तरी राष्ट्रीय चळवळ समजून येते. प्रश्नामध्ये आता टिळकांनी गणेश जयंती कधी चालू केली? याच्याही पुढे जाऊन, 'गणेश जयंती कोणत्या उत्सवावरून साजरी करण्यात आली? असे प्रश्न येउ लागले आहेत. त्यामुळे रट्टा मारण्यापेक्षा थोडा आवाका हि वाढवला पाहिजे.
आयोगाने प्रश्न विचारताना अभ्यासक्रमामध्ये जेवढे उपघटक दिले आहेत, त्यावर एक तरी प्रश्न विचारलाच आहे. त्यामुळे संदर्भ ग्रंथ वाचताना तो मुद्दा वाचून झाला आहे का हे पडताळून पहा. वाचन झाल्यानंतर कालानुक्रम, महत्त्वाच्या घटना, व्यक्ती, त्यांची वाक्ये टिपून ठेवा. पुस्तकामध्ये अधोरेखित करण्याच्या नादात संपूर्ण पान रेघोट्यानी भरले जाते, आणि उपयुक्त मुद्दा पुन्हा उजळणी करताना विसरून जातो.
इतिहास हा विषय तसा सगळ्यांच्या आवडीचा, यामध्ये कथा रूपात वेगवेगळी पात्रे असतात. वाचताना हा विषय सोप्पा आणि समजला असं वाटतं, पण प्रश्न सोडवताना 'अरे नेमका कोण होते? त्यावेळी नक्की काय घडला होते? आदी प्रश्नांचीही अचूक उत्तरे देता येत नाहीत. तर मग यासाठी काय करायला पाहिजे?
वरील तक्त्याप्रमाणे ठराविक समाजसुधारकांवर प्रश्न असतोच, मग त्यासाठी त्यांचा विस्तृत परिचय, वाचन झाला पाहिजे. बाजारातील पुस्तकांमध्ये एक- दोन पानांमध्ये फक्त घटना आणि सनावळ्या दिलेल्या असतात, त्यामुळे फक्त डेटा कळतो पण माहिती मिळत नाही. आणि ज्यांना पाठांतर जमत नाही, त्यांचेतर खूपच अवघड. महात्मा फुले, टिळक, महात्मा गांधी, आंबेडकर यांच्याबरोबर पंडित नेहरू हि तेवढेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येक वर्षी त्यांच्यावर प्रश्न आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांबरोबर भारतातील समाजसुधारक हि तेवढेच महत्वाचे, आयोगाकडून महिला समाजसुधारक यांच्यावर हि दरवर्षी प्रश्न विचारला जातो.
यासाठी विषयाचे वर्गीकरण करून ठेवावे. वेगवेगळ्या पुस्तकातून संदर्भ गोळा करून एकाच कोणत्यातरी पुस्तकामध्ये तो लिहून ठेवावा म्हणजे उजळणी करताना सोपे होईल. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची; क्रांतिकारकांचे कार्य जेवढे महत्त्वाचे तेवढेच ब्राह्मणेत्तर चळवळीचे. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थाबरोबर देशातील संस्थाचाही अभ्यास अनिवार्य आहे. हे सर्व का, तर कारण असे कि यावर दरवर्षी प्रश्न विचारला आहेच.
विद्यार्थ्यांकडून अजून एक गल्लत होते, ती म्हणजे इतिहासाचा अभ्यास म्हणजे १८५७ ते १९४७ आणि राष्ट्रीय चळवळ. हा विभाग महत्त्वाचा आहेच, पण मागील प्रश्नपत्रिका पाहता मध्ययुगीन भारतावर २०१४ ला ९ प्रश्न विचारले होते, तर प्राचीन भारतावर ५-६ प्रश्न होते. इतिहासाला दरवर्षी १८-२० प्रश्न असतात म्हणजे २०% भर आहे. त्यातील वर उल्लेखलेल्या प्रमाणे राष्ट्रीय चळवळीवर फक्त ५-६ प्रश्न आहेत, बाकी समाजसुधारक, मध्ययुगीन आणि प्राचीन विभागावर आहेत म्हणजे याचाही विद्यार्थ्यां कडून कुठे तरी विचार झाला पाहिजे. कारण अभ्यासक्रम देताना आयोगानाने 'भारताचा इतिहास (विशेषतः महाराष्ट्राचा) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ ' असे दिले असले तरी वरील विस्तृतपणा नक्कीच महत्त्वाचा आहे.
भूगोल पर्यावरण व कृषी
Sr. no.प्रकरण 2013 2014 2015 2016
1.प्राकृतिक भूगोल - भूरचना महाराष्ट्रातील रचना 19 20 17 12
2.महाराष्ट्रातील आर्थिक भूगोल - खनिज पर्यटन, प्रकल्प, पर्यावरण9 5 10 12
3.महाराष्ट्रातील मानवी व सामाजिक भूगोल- ग्रामीण व शहरी 1 4 4 1
4.पर्यावरणीय भूगोल- प्रदूषण, कायदे , कार्यक्रम 23 17 13 8
5.जनसांख्यिकी 6 3 5 7
6.सुदूर संवेदना- रचना, कार्य, माहिती 5 6 5 6
7.कृषी
कृषी परिस्थितिकी- नैसर्गिक पीक उत्पादन 7 11 18 16
8.हवामान - भारतातील हवामान, कृषी 4 4 8 18
9.मृदा- गुणधर्म, व्यवस्थापन 10 5 6 10
10.जल व्यवस्थापन 9 12 2 7
Sr. no. Pattern 2013 2014 2015 2016
1.एका वाक्यात प्रश्न 46 44 20 20
2.दोन पर्यायी प्रश्न 7 7 38 2
3.बहुपर्यायी प्रश्न 18 21 12 22
4.एक वाक्य- चार पर्याय प्रश्न 19 9 17 11
5.जोड्या लावा 5 6 2 14
मुख्य परीक्षे मध्ये भूगोल+ पर्यावरण+ कृषी+ मिळून ८३-८८ प्रश्न विचारले जात होते, २०१६ मध्ये तर ९५ च्या आसपास प्रश्न आहेत. यावरून पेपर १ मध्ये आणि एकूण मार्कांमध्ये या घटकाचे महत्व आहे. परत एकदा आवर्जून सांगावेसे वाटते कि ज्यांच्या प्राकृतिक भूगोल च्या संकल्पना व्यवस्थित आहेत, त्यांना मुख्य परीक्षेत हि फायदा आहे. यावर १७-२० प्रश्न असतात. अभ्यासक्रमामध्ये २.२ महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल असे जरी लिहले असले तरी काही प्रश्न भारताच्या आर्थिक भूगोलावर विचारलेले आहेत. २.३ ,२.५ एकावेळी अभ्यास करावा. यामध्ये सुद्धा भारताचा विचार करावा. सध्या प्रश्न प्रथम ३ कोण ? यापेक्षा ४-५ पर्यायाची चढता- उतरता क्रम लावा असे येत आहेत. त्यामुळे त्यांचे विश्लेषण अगोदरच केले असले तर उजळणी करताना फायद्याचे ठरेल.
पर्यावरणीय भूगोल आपले महत्व अधोरेखित करत आहे, २०१३-१४ ला यावर १७-२० प्रश्न एका वाक्यातील होते, पण २०१५ मध्ये सखोल प्रश्न विचारले जाऊ लागले. कृषी घटकावर ३०-३२ प्रश्न आहेत, यावर मुख्यतः कृषी परिस्थितिकि , हवामान, मृदा आणि जलव्यवस्थापन यांचा समावेश आहे. अपुऱ्या संदर्भग्रंथा मुळे यातील सोपे प्रश्न हि Attempt करता येत नाहीत. अभ्यास करताना टप्प्याटप्प्याने गेलो तर हा विषय मार्क घेण्यासाठी सोपा आहे. उदा. गंगा नदीच्या उपनद्या , त्यांचे खोरे, शेजारील राज्ये आणि लोकसंख्या या खोऱ्यात होणारी शेती, उद्योग खनिजे, जैव विविधता , आढळणारी मृदा केलेले जलव्यवस्थापन यावरील प्रत्येक घटकावर प्रश्न विचारला आहे त्यामुळे अभयसक्रम पाठ असेल तर या गोष्टींचा संबंध लावता येतो.
जेवढा सुदूर संवेदना (५-६) प्रश्न बाऊ केला जातो, त्यापेक्षा मृदा आणि जलव्यवस्थापन (८-२० प्रश्न) केला जात नाही. आपण पेपर लिहायचा आंही, त्यामुळे कोणताही न्यूनगंड न ठेवता, आपण जर पदवीचे शिक्षण घेऊ शकतो तर, शालेय NCERT सहज वाचू शकतो. चालू घडामोडीतील घटनांचे नकाशा वाचन झाले तर अजून फायद्याचं ठरेल.
पर्यावरणीय परिस्थितिकि, जैव विविधता आणि हवामान बदला संबंधी सामान्य बाबी ज्यासाठी या विषयावर प्रभुत्वाची आवश्यकता नाही. हे दोन्ही विषय एकत्र घेण्याचे कारण, ते एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यांना वेगळे करू शकत नाही. STI साठी सुद्धा यावर २०१४ च्या १७-२० वरून २०१६ मध्ये २७ प्रश्न विचारले गेले. राज्यसेवा मध्ये २४-३० प्रश्न यावर विचारले आहेत, यावरून या घटकाची उपयुक्तता आणि महत्व जाणवते. परत एकदा मुद्दाम प्रश्नाच्या विश्लेषणाकडे आणि अभ्यासक्रमाकडे पहा यामध्ये ७-१० प्रश्न हे प्राकृतिक घटकावर आहेत. कृषी चा उल्लेख नसला तरी त्यावर २-४ प्रश्न आहेत.
भूगोल हा विषय तसा Technical आहे. Technical म्हटलं कि आर्ट्स कॉमर्स शाखांनी त्याकडे पाठ फिरवावी असे नाही, भूगोलामध्ये घडणाऱ्या घटनांना काही तरी तांत्रिक कारण असत, त्यामध्ये विज्ञानाचा सुद्धा सहभाग आहे त्यामुळे एकदा का हा विषय समजला तर भरपूर प्रश्न Logic ने सुटू शकतात.
आकडेवारी साठी अजून एक गोष्ट लक्षात आली; सामाजिक भूगोल, अर्थशास्त्र आणि मानव विकास (GS३) लोकसंख्या हा घटक समान आहे, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वाचल्याने त्याचे confusion वाढते. म्हणून एकाच संदर्भातून तो वाचावा.
UPSC ची मुलं जेवढा वेळ ऍटलास वर घालवतात, तेवढा वेळ MPSC ची मुलं भूगोलाचा अभ्यास करताना घालवत नाहीत. मुळात इंग्लिश ऍटलास हातात घ्यायलाच हि मुलं घाबरतात. पण नकाशा वाचन , ठिकाणे, भौगोलिक परिस्थिती ज्यांना पक्का माहित आहे, त्यांना परीक्षेमध्ये पर्याय एलिमिनेटे करायला खूप मदत होते. पाठ्यपुस्तकातील नकाशे आणि ऍटलास यासाठी उपयुक्त ठरेल.
भूगोल साठी NCERT ची पुस्तके महत्वाची आहेत, जरी संदर्भ समजला नाही तरी त्यातील नकाशे, तक्ते वाचू शकता. यामधून भरपूर फॅक्ट मिळतात.