राज्यसेवा GS-2





Saturday, November 19, 2016

Type:Main

राज्यसेवा GS-2, तयारी कशी कराल.



राज्यसेवा GS - II (Strategy)

भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण

Sr.No

प्रकरण

2012

2013

2014

2015

1)

भारताचेसंविधान

17

25

14

24

2)

राजकीयव्यवस्था

16

18

15

13

3)

राज्यशासन/संघराज्य

19

09

11

07

4)

जिल्हाप्रशासन

01

02

01

06

5)

ग्रामीणनागरीस्थानिकप्रशासन

13

13

19

12

6)

शिक्षणपध्दती

10

07

09

12

7)

पक्षदबावगट

08

10

09

07

8)

प्रसारमाध्यमे

03

02

12

03

9)

निवडणूकप्रक्रिया

08

13

1404

13

10)

प्रशासकीयकायदा

09

06

07

07

11)

केंद्रराज्यविशेषाधिकार

04

04

05

02

12)

कायदे

16

16

08

16

13)

समाजकल्याण

04

02

04

05

14)

सार्वजनिकसेवा

10

10

12

10

15)

सरकारीखर्चावरनियंत्रण

12

06

10

12

 

Sr.No

Pattern

2012

2013

2014

2015

2016

1)

One Liner

82

53

40

40

78

2)

Two Liner

07

28

35

44

11

3)

3 Line/Multiple

60

60

64

55

58

4)

Match the Pair

01

09

11

11

03


राज्यसेवा मुख्य परिक्षेतील GS-II हा पेपर इतर पेपरपेक्षा अतिशय Scoring असून जर या पेपरचा शिस्तबध्द व रचनात्मक अभ्यास केल्यास अंतिम यादीत ‘फायनल रँक’ ठरविणारा हा विषय आहे. मागील काही वर्षातील अनेक टॉपर्सचे या विषयातील गुण उल्लेखनीय आहेत. यावरुन असे लक्षात येते की हा ‘मेरिट’ ठरवणारा विषय आहे.


2012 ते 2016 प्रश्नपत्रिका विश्लेषण

मागील चार वर्षातील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रकरण 1 ते प्रकरण 6 या 6 घटकांवर जवळपास 70-75 प्रश्न विचारण्यात आले आहेत, तसेच उर्वरित 9 घटकांवर 85 ते 90 प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावरुन असे लक्षात येते की, सुरुवातीचे 6 घटक हे अतिशय महत्वाचे असून तो या विषयाचा पाया आहे.

प्रकरण 1,2,3 

या प्रकरणाचा अभ्यास करताना सर्वप्रथम 5 वी ते 10 वी नागरिकशास्त्र पुस्तके वाचावीत. 

त्यानंतर 11 वी, 12 वी राज्यशास्त्र

सुभाष कश्यप - आपली संसद + डी. डी. बसू (राज्यघटना) किंवा

एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी/रंजन कोळंबे

विद्यार्थ्यांनी या क्रमानेच पुस्तके वाचावीत. या पुस्तकांच्या जोडीला ‘Indian Constitution’ किंवा भारतीय संविधान या App चा वापर करा.

प्रकरण 3 : मधील मुख्य सचिव, सचिवालय, विधानसभा, विधानपरिषद, विधिमंडळ समित्या या साठी महाराष्ट्र विधानमंडळाची Website – mls.org.in चा पुरेपूर वापर करावा. या संकेत स्थळावर पूर्ण माहिती उपलब्ध आहे.


प्रकरण 4 : जिल्हा प्रशासन 

या Topic साठी सद्यस्थितीत M. Laxmikant यांचे ‘Governance In India’ हे पुस्तक तसेच युनिक भाग 1 किंवा जिल्हा प्रशासन बंग सिरीज ही पुस्तके उपयुक्त आहेत.


प्रकरण 5 : पंचायतराज व नागरी स्थानिक प्रशासन

या प्रकरणासाठी साठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ‘लोकप्रशासन’ (Pol 311) हे अतिशय सुंदर व समर्पक पुस्तक आहे. यात विशेषत: भारत व महाराष्ट्रातील विविध समित्यांची अतिशय तपशीलवार माहिती दिली आहे.

हे प्रकरण कमी वेळा जास्तीत जास्त गुण मिळवून देणार आहे.


प्रकरण 6 : शिक्षण व्यवस्था  

या प्रकरणासाठी 11 वी शिक्षणशास्त्र, इंडिया इयर बुक (शिक्षण Topic), MHRD ची Website (मानव संसाधन मंत्रालय) व ‘शासकीय योजना’या पुस्तकातील ‘शिक्षण विभाग’ उपयुक्त ठरतो.


प्रकरण 7 : पक्ष व दबावगट 

या प्रकरणासाठी प्रथम M. Laxmikant यांचे पुस्तक आणि महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक पक्ष यांची अधिकृत संकेतस्थळे अतिशय उपयुक्त ठरतात.


प्रकरण 8 : प्रकारमाध्यमे

या Topic वरील भरपूर प्रश्न Indian Year Book या पुस्तकात आढळतात. याबरोबरच PCI (Press Council of India) Website चा वापर करावा.


प्रकरण 9 : निवडणूक प्रक्रिया

हे प्रकरण देखील कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवून देणारे आहे. या प्रकरणासाठी M. Laxmikant अतिशय फायदेशीर ठरते पण त्याबरोबरच निवडणूक आयोगाची Website - eci.nic.in वापरणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: त्यातील FAQ यावर भरपूर प्रश्न विचारले जातात.


प्रकरण 10

प्रशासकीय कायदा या घटकावर 7 ते 8 प्रश्न दरवेळी विचारले जातात. पण हा घटक अभ्यासाच्या सर्वात शेवटी करावा. यासाठी Internet हा सर्वोत्तम स्त्रोत आहे. तसेच मागील प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करावे.


प्रकरण 11 व 12,13

या तीन घटकावर मागील चार वर्षापासून 20 ते 25 प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे प्रकरण सामान्य अध्ययन II या विषयात गुण मिळविण्याकरता milestone ठरते.

या तिन्ही प्रकरणात मिळून एकूण 12 कायदे असून आयोगाने विशेषत: काही कायद्यातील महत्वाच्या तरतुदी व कलमे व त्यांच्या व्याख्यांवर विशेष भर दिला आहे.

विद्यार्थ्यांनी सर्व 12 कायदे स्वतंत्रपणे इंटरनेटवरुन प्राप्त करुन त्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास निश्चित फायदा होतो. या प्रकरणासाठी विद्यार्थ्यांनी Group Discussion आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. या प्रकरणासाठी युनिक भाग II व Bare Acts (प्रत्येक कायदा) यांचा तुलनात्मक अभ्यास करावा.


प्रकरण 14 : सार्वजनिक सेवा

या प्रकरणातील UPSC, MPSC, YASHADA, LBSNAA, SVPNPA या संस्थांच्या अधिकृत संकेत स्थळांचा पूर्ण अभ्यास करावा.


प्रकरण 15 : या प्रकरणातील CAG महालेखापाल वित्त मंत्रालयाची भूमिका यासाठी M. Laxmikant यांचे Governance in India हे पुस्तक अतिशय महत्वपूर्ण ठरते.


;