"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे”, पण नक्की काय करावे या संभ्रम अवस्थेत विद्यार्थी असतो. त्याला योग्य मार्गदर्शन करणे जेणेकरून त्याच्यातील बुद्धिमत्ता, चिकाटी, प्रयत्न यांचा पुरेपूर वापर त्याच्या ध्येयपूर्ती साठी करणे.
महाराष्ट्र आणि केंद्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यासाठी लागणारे मार्गदर्शन , संदर्भग्रंथ सगळ्यांनाच उपलब्ध होईल असे नाही. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यां बरोबर ग्रामीण भागातील परीक्षार्थीना मार्गदर्शन करणे आमचा उद्देश आहे. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या विद्याशाखा मधून विद्यार्थी येतात, सध्या भरपूर स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि त्याचे व्यवस्थित नियोजन नसल्या कारणाने योग्य तो परिणाम हाती येत नाही. या सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम हा थोडाफार समान आहे, आणि त्यासाठी मूलभूत पायाभरणी हि भक्कम पाहिजे.
आम्ही MPSC UPDATE TEAM स्वतः या क्षेत्राशी निगडित असून यामध्ये अधिकारी , डॉक्टर, भाषातज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, व्यवस्थापन शास्त्रात काम करत आहोत.
स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीची फी भरता येत नाही, किंवा संदर्भग्रंथ नाही, म्हणून कोणाच्या प्रगतीसाठी जर अडथळा येत असेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने हे वेब पोर्टल चालू केले आहे.