ASO Paper-2

Saturday, November 19, 2016

Type:Main

ASO Paper-2, तयारी कशी कराल.


ASO पेपर क्र.2 Strategy


(I) चालू घडामोडी

चालू घडामोडी या विषयांचा अभ्यास दररोज केल्यासच परिक्षेत उत्तम गुण मिळतील. या विषयासाठी सकाळ, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स सारखी वृत्तपत्रे, PIB (Press Information Bureau) चे App किंवा Website व लोकराज्य सारखी मासिके उत्तम स्त्रोत आहेत.
विद्यार्थ्यांनी नियमित चालू घडामोडीतील प्रत्येक विभाग - राजकीय, सामाजिक, आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रिडा, व्यक्तीविशेष आणि पुरस्कार स्वतंत्र Notes काढाव्यात.
या बरोबरच चालू घडामोडी या विषयासाठी - सकाळ current updates आणि पृथ्वी / युनिक इत्यादी. कोणतेही एक मासिक वाचायला हरकत नाही.
परीक्षेला कमी वेळ असताना विविध प्रकाशनाची मासिके उपयुक्त ठरतात पण स्वत:च्या हस्तलिखित Notes कधीपण इतरांपेक्षा सरस ठरतात.


(II) बुद्धिमत्ता चाचणी:

या विषयात दररोज सराव केल्यास निश्चितच चांगले गुण मिळतात. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वा. ना. दांडेकर सारखी पुस्तके अभ्यासल्यानंतरच R . S Agarwal यांची पुस्तके वापरावीत.


(III) महाराष्ट्राचा इतिहास 

इतिहास ह्या विषयासाठी सध्यातरी वाचन जास्त आणि Output कमी येत आहे. तरीपण मुख्य परिक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.

या विषयात महाराष्ट्राच्या इतिहासावर बरेच प्रश्न विचारले जातात. त्यासाठी अनिल कटारे यांचे पुस्तक पुरेसे ठरते.


(IV) महाराष्ट्राचा भूगोल

भूगोल ह्या विषयात संकल्पना व Factual Data यांचा संगम आढळतो. पण योग्य नियोजन व रचनात्मक अभ्यास केल्यास निश्चितच जास्त गुण मिळतात.

भूगोल हा विषय 3 विभागात वर्गीकृत केला जाऊ शकतो.

(I) प्राकृतिक (II) मानवी व सामाजिक (III) आर्थिक

या प्रकरणासाठी राज्य शासनाची पुस्तके व महाराष्ट्राचा भूगोल खतीब (K’sagar) ही पुस्तके पुरेसी आहेत. अभ्यासक्रमातील विविध मुद्यांसाठी ए. बी. सवदी सरांचे ‘महाराष्ट्राचा प्रगत Atlas’ ह्या पुस्तकांचा आधार घेतल्यास निश्चितच फायदा होतो.

 

(V) भारतीय राज्यघटना व पंचायतराज


Polity हा विषय कमी वेळात जास्त गुण मिळवून देणारा आहे. GS मधील इतर विषयांशी तुलना करता संकल्पना नीट समजल्या असल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतात.
या विषयासाठी सर्वप्रथम M. Laxmikant किंवा कोळंबे सरांचे पुस्तक उत्तम स्त्रोत आहे. पण काही मुद्यांसाठी ‘”आपली संसद - सुभाष कश्यप” ह्या पुस्तकाचा आधार घ्यावा.
पंचायतराज हे प्रकरण YCMOU (मुक्त विद्यापीठ) च्या पुस्तकांतून पूर्णपणे वाचून त्यावर Charts च्या रुपात तुलनात्मक notes काढाव्यात.


(VI) माहिती अधिकार अधिनियम 2005


या प्रकरणासाठी यशदा चे माहिती अधिकारावरील पुस्तक व त्या बरोबरच सर्वोच्च न्यायालय च्या RTI बद्दल विविध केसेस आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा.


(VII) संगणक तंत्रज्ञान (Computer Technology)

हे प्रकरण ज्या विद्यार्थ्यांची संगणक विषयात पदवी झाली आहे यांना सोपे जाते पण इतर शाखेच्यार विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम MS-CIT चे Basic पुस्तक वाचावे व त्यातील मुलभूत संकल्पना समजून घ्याव्यात. त्याबरोबरच राज्यसेवा मुख्यपरिक्षेतील तसेच PSI/STI/ASO याच्या मुख्य परिक्षेतील संगणक विषयावरील मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा.


(VIII) राजकीय यंत्रणा, केंद्रीय विधिमंडळ, राज्यप्रशासन आणि न्यायमंडळ 

    • या प्रकरणाचा अभ्यास करताना सर्वप्रथम 5 वी ते 10 वी नागरिकशास्त्र पुस्तके वाचावीत.
    • त्यानंतर 11 वी, 12 वी राज्यशास्त्र
    • सुभाष कश्यप - आपली संसद + डी. डी. बसू (राज्यघटना) किंवा
    • एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी/रंजन कोळंबे
    • विद्यार्थ्यांनी या क्रमानेच पुस्तके वाचावीत. या पुस्तकांच्या जोडीला ‘Indian Constitution’ किंवा भारतीय संविधान या App चा वापर करा.
    • या प्रकरणामधील मुख्य सचिव, सचिवालय, विधानसभा, विधानपरिषद, विधिमंडळ समित्या या साठी महाराष्ट्र विधानमंडळाची Website – mls.org.in चा पुरेपूर वापर करावा. या संकेत स्थळावर पूर्ण माहिती उपलब्ध आहे.
    • लोकपाल आणि लोकायुक्त हि प्रकरणे M. Laxmikant या पुस्तकातून अभ्यासावीत. PIL (जनहित याचिका) साठी सर्वोच्च न्यायालय च्या PIL बद्दल विविध केसेस आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास करावा.


(IX) जिल्हा प्रशासन, पंचायतराज व नागरी स्थानिक प्रशासन

या Topic साठी सद्यस्थितीत M. Laxmikant यांचे ‘Governance In India’ हे पुस्तक तसेच युनिक भाग 1 किंवा जिल्हा प्रशासन बंग सिरीज ही पुस्तके उपयुक्त आहेत.या प्रकरणासाठी साठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ‘लोकप्रशासन’ (Pol 311) हे अतिशय सुंदर व समर्पक पुस्तक आहे. यात विशेषत: भारत व महाराष्ट्रातील विविध समित्यांची अतिशय तपशीलवार माहिती दिली आहे.हे प्रकरण कमी वेळा जास्तीत जास्त गुण मिळवून देते.

 

;