Atul Anil Kanade
आईच्या डोळ्यात अश्रू आले, हि सर्वात मोठी यशाची पोचपावती होती. कमी वयात हि परीक्षा पास होऊ शकतो याचा दाखला दिला आहे, अतुल कानडे यांनी. त्यांची मुलाखत त्यांच्या शब्दात.... interview
Biography
अतुल कानडे :
आईच्या डोळ्यात अश्रू आले, हि सर्वात मोठी यशाची पोचपावती होती. कमी वयात हि परीक्षा पास होऊ शकतो याचा दाखला दिला आहे, अतुल कानडे यांनी. त्यांची मुलाखत त्यांच्या शब्दात....
नाव: अतुल अनिल कानडे
शिक्षण: B.E (Computer)
पद: अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क..
यापूर्वी दिलेल्या परीक्षा :-
मुलाखत- 2014 & 2015
मुख्य परीक्षा: 2013, 2014, 2015
1) आपण स्पर्धा परीक्षांची तयारी कोणत्या वर्षी सुरु केली?
23 व्या वर्षी, 2013 सालात
2) पदवीला असतानाच MPSC/UPSC करण्याचे ठरवले होते की, पदवी पूर्ण झाल्यानंतर MPSC चा पर्याय निवडला?
पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच ठरवले होते की, स्पर्धा परीक्षा द्यायची आणि प्रशासनात करिअर करायचे.
3) पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच हा निर्णय का घेतला?
प्रशासकीय अधिकाऱ्यांची अनेक प्रेरणादायी पुस्तके माझ्या वाचण्यात आली त्यामुळे या क्षेत्राबद्दल आकर्षण वाढत गेले.
4) तुम्ही BE Computer आहात तर, Campus Interview देवून Corporate मध्ये जाण्याचा पर्याय तुमच्या डोक्यात होता का?
नाही. त्याचे कारण म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे आहेच पण, Degree ला 3rd year/2nd SEM Backlog होता. त्यामुळे Campus चा पर्याय डोक्यात नव्हता. एकदा बाहरुन नोकरीसाठी प्रयत्न केला होता, पण तेथे समाधान मिळाले नाही, मग स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केल्यावर विचार नाही केला.
5) तुमचे शिक्षण शहरी भागात झाले का ग्रामीण भागात?
12 वी पर्यंत अहमदनगरमध्ये, नंतर Degree पुण्यात.
6) राज्यसेवेसाठी किती वेळा प्रयत्न केले होते?
हा माझा तिसरा प्रयत्न आहे. मागील वेळेला सुध्दा मी मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो, मात्र अंतिम निकालात माझे नाव नव्हते.
7) या व्यतिरिक्त दुसर्या कोणत्या परीक्षा तुम्ही दिल्या होत्या आणि यशस्वी झाला होता?
आत्ताच निकाल लागलेल्या STI परीक्षेत सुध्दा मी यशस्वी झालो होतो.
8) तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा तुमचा तिसरा प्रयत्न होता, तर मागील दोन प्रयत्नामधल्या अपयशाला तुम्ही कसे सामोरे गेलात?
मी सुरुवातीला दु:खी झालो, पण मग मीच आत्मपरीक्षण केले, की वाचन कुठे चुकतेय का, नियोजन , धोरण त्याची अंमलबजावणी यांच्यात थोडा बदल केला. त्यामध्ये पारंपरिक पुस्तकांबरोबर, सर्वात महत्वाचे म्हणजे इंटरनेट आणि Govt. Resources वापरणे, जसे Ministry च्या Website, Survey, Report, etc.
9) या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि यशस्वी विद्यार्थी आणि यशस्वी न होणारे विद्यार्थी यांच्या तयारीमध्ये काय फरक असतो?
सर्वात महत्वाचे नियोजन आणि एक ना धड भाराभर चिंध्या नकोत. अनेक विद्यार्थी एकाच वेएी अनेक फॉर्म भरतात आणि मग कोणत्याच परीक्षेचा पूर्ण अभ्यास होत नाही. मेरीटसाठी जसा अभ्यास लागतो तसा होत नाही. त्यामुळे एकावेळी एकाच परीक्षेकडे लक्ष केंद्रीत करा, म्हणजे नियोजन आणि अंमलबजावणी करता येईल आणि MPSC उत्तरतालिका देतेच. जर दिलेल्या परीक्षेचे गुण चांगले येत नसतील तरच पुढच्या परीक्षेच्या तयारीला लागा आणि मग त्याचा अभ्यास करताना त्याचाच अभ्यास करा.
10) सद्य: परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करावा आणि त्याचे गुण काय असावे?
1) शाळेची पुस्तके + NCERT
2) Government + Sources + Survey + Report + Website
3) Factual data update करण्यासाठी आणि सर्व परिस्थिती, चालू घडामोडी यांचा संदर्भ लक्षात घ्यावा आणि त्यासाठी इंटरनेटचा पर्याप्त वापर करावा.
4) आणि योग्य ते संदर्भ पुस्तके, साहित्य संदर्भ साहित्यांची संख्या 1 किंवा 2 च असावी. त्याचेच वाचन सारखे करावे.
5) वर्तमानपत्रे
6) मागील प्रश्नपत्रिका
11) तुम्ही MPSC राज्यसेवा किंवा इतर परीक्षा यांचे विश्लेषण कसे कराल?
विज्ञान, भूगोल, राज्यशास्त्र हे तीन विषय सोडले तर, MPSC परीक्षेत इतर विषयासंबंधी Out of Box विचार करणे. जास्त पुस्तक वाचून चालत नाही, वर सांगितल्याप्रमाणे बाकीच्या गोष्टींचा पण अभ्यास करावा लागतो आणि Strategy बनवावी लागते.
12) तुम्ही स्वत:ची तयारी कशी केली होती?
मी स्वत: विज्ञान, भूगोल, राज्यशास्त्र यांचाच जोर लाऊन अभ्यास केला आणि C-SAT ला जास्त भर दिला म्हणून पूर्व परीक्षा सहज पास होत होतो. C-SAT ला 100 पर्यंत तरी गुण असावे. बाकी GS ला Cover करता येतो. कारण मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षेचा GS चा अभ्यासक्रम Strategy मध्ये नाही.
13) तुमची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची Strategy कशी होती?
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मुद्यांसहित दिल्यामुळे, मला मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन करताना आणि Sources गोळा करताना फार त्रास नाही घ्यावा लागला. मला मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेपेक्षा जास्त आव्हानात्मक वाटते.
14) तुम्ही Pre Mains ला किती वेळ अभ्यासाला देत होता?
दररोज 8 ते 9 तास अभ्यास केला. अभ्यासात सातत्य हवे नाहीतर लिंक तुटते. अभ्यासाचा व आकलनाचा तो ब्रेक घेतो तसे होऊ नये.
15) अभ्यास करताना भर पाठांतरावर देता का?
विषय समजून घेण्याकडे कारण स्पर्धापरीक्षा म्हणजे पाठांतर हा गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पहायला मिळतो. मी स्वत: पाठांतर केले नाही, याचे कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक विषयाचा, मुद्याचे बेसिक समजून घ्याल त्याच्या मागच्या पुढच्या गोष्टी वाचाल, समजाल व त्याची कारणे तपासा, त्यावेळी बाकी गोष्टी या तितक्याच आपोआप लक्षात राहतात म्हणजे एखाद्या वर्षी एखाद्या गोष्टीचे टक्के कमी का झाले याची कारणे समजली की आकडेवारी लक्षात राहते.
16) मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मुलाखतीची तयारी कोणत्या पध्दतीने केली?
मला मुख्य परीक्षेचा स्कोर आल्यानंतर समजत होते की मुलाखतीला जावे लागणार त्यामुळे त्याची तयारी मी लगेचच सुरु केली.
17) मग त्याची तयारी कशी केली?
मुख्य म्हणजे स्वत:च्या Bio-Data वरच मी तयारी केली होती. मी मेळघाट कॅम्प केला होता तर, त्या संदर्भात प्रश्न विचारले होते. सद्यस्थितीवर प्रश्न विचारले होते आणि माझं मत विचारले होते. उदा.
1) सोनसाखळी चोरी वाढत आहे त्यासाठी कायदा काय?
2) मतदानाचे प्रमाण कमी आहे त्यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि त्याची कारणे काय आहेत?
रोजचा अभ्यास जरी नीट समजून केला, त्यावर विचार करत असाल तर मुलाखतीत वेगळे काही करण्याची गरज उरत नाही.
18) मुलाखतीचा निकाल लागल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का लागला की माहित होते की माझे अंतिम निकालात नाव असणार.
हो, मला माहित होते की क्लास-1 तर मिळेल पण पहिला येईन हे वाटत नव्हते त्यामुळे दोन्ही प्रतिक्रिया घडल्या.
19) कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती?
आईच्या डोळ्यात पाणी ही महत्वाची गोष्ट घडली. कारण माझे वडील मी दहावीतच असताना वारले होते. त्यामुळेच आईच्या आधारानेच इथपर्यंत पोहोचलो होतो आणि महत्वाचे म्हणजे माझे मामा, ज्यांच्या आधारानेच आम्ही राहू शकलो त्यांच्या आर्थिक पाठिंब्यामुळे काही गोष्टी शक्य झाल्या, त्यामुळे त्यांना समाधान महत्वाचे होते.
20) आपल्या यशामध्ये कोणाचे योगदान आहे?
कुटुंब, मित्र, यांनी नेहमीच साथ दिली.
21) तुम्हाला या प्रवासात कधी अपयशामुळे डिप्रेशन जाणवले का? आणि या 24-25 वयात येणारे Depression कसे हाताळावेत?
1) मी सर्व परीक्षा लवकरात लवकर पास झालो होतो त्यामुळे डिप्रेशन कधी आले नाही. ते यायच्या आतच पास झालो.
2) माझी आवडच स्पर्धा परीक्षा असल्याने भटकायचा काही प्रश्न नव्हता, पुस्तक वाचताना जे काही नवीन वाचण्यात येत होते त्यामुळे कंटाळा यायचा नाही, त्याव्यतिरिक्त फिरणं चालू असायचे पण मर्यादित.
3) Targeted आणि Focus होतो याचा जास्त फायदा आता सर्वच गोष्टीत होतो.
22) वाचकांसाठी काय संदेश आहे?
MPSC बद्दल गैरसमज दूर व्हावेत. काही मुलं 22-23 ला सुध्दा यशस्वी होतात आणि याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शक्य तितचे लवकर परीक्षेला बसावे आणि कमी वयात यशस्वी व्हावे.
राज्यसेवा (2015) Interview
नाव : अतुल अनिल कानडे
पॅनेल : श्री. पटेल सर वेळ : 23 ते 24 मिनीटे
- तुम्ही मुळचे अहमदनगरचे आहात. मग पुण्यात अभ्यास करता का?
- नगरला Facilities नाहीत का अभ्यासासाठी?
- सध्या Local Bodies ला वरुन बरेच Funds येतात. विविध योजनांसाठीही वित्तीय तरतुद असते. त्यामध्ये मग भ्रष्टाचार होतो. मग लोकप्रतिनिधी (जे सही करतात) त्यांच्यासाठी शिक्षणाची अट असावी का?
- (मी नाही म्हणलो - साक्षर असावेत परंतु विशिष्ट शिक्षण पातळीची अट नसती असे म्हणालो) आपण जर RTE कायदा आहे तरी पण शिक्षणाची अट नको का?
- शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा मतदान कमी होते. शहरामध्ये सुशिक्षित लोक असूनही मतदान करत नाही. यावर काय करता येईल. मी Voting Day आठवड्याच्या मध्यभागी ठेवावा असे म्हणालो. कारण जोडून आलेल्या सुट्ट्यामुळे लोक इतर कामांना किंवा पर्यटनाला Preferance देतात. अजून काही करता येईल का? मी SVEEP बद्दल सांगितले. SVEEP चे Features सांगा.
- तुमच्या Degree मध्ये BE (IT/Comp. Engg. Science Engg. असे पर्याय आहेत यापैकी तुम्ही काय केलय IT आणि Comp. Engineering मध्ये काय फरक आहे?
- पुण्यात साखळीचोरीच्या घटना वाढल्या आहेत यावर काय उपाय करता येतील.
- तुम्ही कोणत्या Camp मध्ये काम केले आहे (माझ्या Extra Activities मध्ये Camp बद्दल उल्लेख होता.) काय समस्या आहेत मेळघाटच्या
1) मेळघाटामधील मुख्या समस्या कोणत? कुपोषण कसे मोजले तुम्ही स्त्रियांच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत? हिमोग्लोबीन किती हवे? तुम्हाला किती स्त्रिया आढळल्या हिमोग्लोबीन कमतरता असलेल्या.
2) तुम्ही मला मेटघाटमध्ये Local Level ला काय उपाययोजना करता येतील ते सांगा.
3) Ethical Hacking म्हणजे काय (Being BE (Comp) Engineer)
- आता Parliament चे कोणते Session चालू आहे.
- काय असते Budget Session मध्ये
- Finance Bill काय असते.
पुन्हा शेवटी
1) तुम्ही मागच्या वेळीही Interview ला होता. कुठे कमी पडलात? मागच्या वेळी किती Marks होते. Interview ला?
2) Preference काय दिलेत तुम्ही (माझा पहिला Preference SP, Excise होता)
3) का दिलात हा पहिला Preference