विठ्ठल रोहिदास उदमले


Contact Member

Vitthal Rohidas Udamale

उपजिल्हाधिकारी

मी स्वत: सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय सेवेत येऊन समस्या सोडवण्याचे ठरवले. अभ्यास करताना स्वत:शी प्रामाणिक राहून फक्त हार्ड वर्क न करता त्याला स्मार्ट स्टडीची जोड दिली. interview


Biography

मनात लाल दिव्याचे आकर्षण होते. मी स्वत: सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय सेवेत येऊन समस्या सोडवण्याचे ठरवले. अभ्यास करताना स्वत:शी प्रामाणिक राहून फक्त हार्ड वर्क न करता त्याला स्मार्ट स्टडीची जोड दिली. अपयश आले तेव्हा मला पण टेन्शन येई परंतु त्यातून सावरुन मी पुन्हा अभ्यास करत असे. अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही.

... अथक परिश्रमाचे फळ भेटतेच; सांगत आहेत ....विठ्ठल उदमले

वैयक्तिक माहिती

नाव : विठ्ठल रोहिदास उदमले

 वय : 26 वर्षे
पत्ता : अहमदनगर
पालकांची माहिती शेतकरी
शिक्षण : BA English TET


आत्तापर्यंत दिलेल्या स्पर्धा परिक्षा
राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2011, 2014, 2015 

मुलाखत- 2014, 2015


निवड : Deputy Collector - 5

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार. मित्रांनो माझे 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे या गावात झाले. मी 2006 साली 10 वी व 2008 साली 12 व कला शाखेत उत्तीर्ण झालो. त्यानंतर मांडवगण फराटा येथील श्री. व्याघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र वसंतराव फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील S. P. कॉलेज येथे पदवीसाठी अॅडमिशन घेतली. त्याचवेळी श्री. राजेंद्र फराटे सरांनी मला स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातील स्टडी सर्कल येथे पाठविले. त्यानंतर 2010-11 पासून मी स्टडी सर्कल येथे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करत असताना मला डॉ. आनंद पाटील सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 2011 साली पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालो. परंतु पदवीचे प्रमाणपत्र नसल्याने मला मुख्य परिक्षा देता आली नाही. त्यामुळे मी निराश झालो. परंतु हिम्मत करुन पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर 2014 मध्ये मी राज्य सेवेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलो पण पोस्ट मिळाली नाही. हिम्मत न हारता पुन्हा अभ्यास केला आणि 2015 च्या राज्य सेवेतून माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.

मी दिवसातील 12 ते 14 तास अभ्यास करत असे. अभ्यास करताना स्वत:शी प्रामाणिक राहून फक्त हार्ड वर्क न करता त्याला स्मार्ट स्टडीची जोड दिली. अपयश आले तेव्हा मला पण टेन्शन येई परंतु त्यातून सावरुन मी पुन्हा अभ्यास करत असे. अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. जे काही वाचन केले त्याचे व्यवस्थित रिव्हीजन केले. त्यामुळेच मला हे यश मिळाले आहे. या यशात मला नेहमी पाठिंबा देणारे श्री. राजेंद्र फराटे सरांचा मोलाचा वाटा आहे. माझ्या यश - अपयशात त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने, माझ्या कुटुंबाने आणि माझ्या मित्रांनी मला नेहमी साथ दिली. तसेच वेळोवेळी डॉ. आनंद पाटील सरांचे मार्गदर्शन लाभले. अशा या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा..


1) MPSC च्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे आपण का ठरविले?

माझ्या मनात स्पर्धा परिक्षांविषयी आवड राजेंद्र फराटे यांनी निर्माण केली. मनात लाल दिव्याचे आकर्षण होते. मी स्वत: सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळे अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय सेवेत येऊन समस्या सोडवण्याचे ठरवले.

2) आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून गेलेले आहात, तर या प्रक्रियेबद्दल आपले काय मत आहे?

MPSC ची राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा Objective असल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आहे. रिझल्टचा कालावधी आटोपशीर आहे. (एका वर्षात जाहिरात येऊन त्याच वर्षात रिझल्ट लागतो.) त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळते. वेळापत्रक चांगले आहे. Online Admission असल्यामुळे भ्रष्टाचार नाही. Answer Key आणि Cut-Off जाहीर होत असल्याने तयारीचे नियोजन चांगले करता येते.

3) पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे?

पूर्वी परीक्षेचे पूर्वीचे पेपर, अभ्यासक्रम, प्रश्नांची पातळी पाहून वेळापत्रक आखून अभ्यास करावा. स्टेट बोर्डचे पुस्तक वाचणे. पेपर (अगोदरच्या वर्षाचे) परीक्षा पध्दतीनुसार अभ्यास करावा.

4) मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी आपण रोज किती तास वेळ दिला? मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यावर केला की अगोदरच सुरु केला होता?

12 ते 14 तास अभ्यास केला. पूर्व परीक्षा झाली की, लगेचच सुरुवात केली. रिझल्टची वाट न पाहता सातत्याने प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिलो. ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला.

5) मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना अधिक महत्वाचे काय आहे? जास्तीतजास्त पुस्तके वाचणे की एकच पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करुन स्वत:चे नोटस् तयार करणे?

वाचन करुन उजळणी करणे महत्वाचे आहे. सभोवताली घडणार्या घडामोडीची उजळणी करणे महत्वाचे आहे.

6) मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीला जाण्याअगोदर व मुलाखत झाल्यानंतर आपल्या मनात काय विचार आले होते?

मुलाखती अगोदर भिती नव्हती, पण मुलाखतीमुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे भिती नव्हती. सकारात्मक मुलाखत दिली. मुलाखतीनंतर रिलॅक्स झालो, मनावरचे दडपण कमी झाले, मुलाखत उत्तम झाली.

7) आपणास मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले गेले होते?

   • कोठून आलात काय करता?
   • अगोदर अभ्यासाचा कालावधी विचारला, किती वेळा Mains Interview झाला?
   • Degree Subject
   • Shakespere Comedy नाव
   • गांधीजींचे आत्मचरित्र
   • विनोबा भावेंचे कार्य
   • वेदांची नावे
   • वेगनर खंडवन सिध्दांत
   • हिमालयाची माहिती
   • Degree विषय - कविता 
   • नाम फौंडेशन

8) अंतिम निकाल जाहीर झाल्याचे आपण कसे समजले व निकाल कळला तेव्हा आपल्याला काय वाटले? आपल्या यशाबद्दल आपल्या परिवाराची प्रतिक्रिया, त्यांच्या भावना काय आहेत?

ध्येय प्राप्ती झाली, स्वप्नपूर्ती (मित्रांनी अभिनंदनाचे फोन केले) रिझल्ट 2 तासानंतर कळला. स्वत: पाहिल्याशिवाय विश्वास बसत नव्हता. 2 दिवस विश्वास बसत नव्हता. रोज लिस्टमध्ये पाहत होतो. सर्वांना आनंद वाटला. कष्टाचे चीज झाले असे परिवार व नातेवाईकांना वाटले.

9) आपल्या यशामध्ये कोणाचे मोलाचे योगदान आहे?

राजेंद्र वसंतराव फराटे या सरांनी स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे योगदान मोलाचे आहे. आर्थिक, मानसिक पाठबळ दिले. कुटुंब व मित्रपरिवारांनी साथ दिली.

10) आपणास परीक्षेची तयारी करीत असताना बरेच गोड-कडू अनुभव आले असतील की ज्यांच्यामुळे आपणास बरेच काही शिकावयास मिळाले. असा एखादा अनुभव वाचकांना सांगता येईल का? स्टडी सर्कल बद्दलच्या आपल्या आठवणी कशा आहेत?

2011 पूर्व पास होऊन मुख्य परीक्षा देता येत नव्हती. फक्त Degree नसल्यामुळे त्यानंतर 2 वेळा पूर्व पास होत नव्हतो. मग उदास झालो. 2014 पूर्व, मुख्य, मुलाखतीपर्यंत जाऊन गुणवत्ता मार्क नव्हते. पण नवीन उमेदीने अभ्यास चालू करुन अपेक्षित पद मिळवले.

 

;