Rahul Dhas
परीक्षा देतानाचा काळ हा संघर्षाचा असतो. तेव्हाच आपल्याला बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते आणि याच काळात आपल्याला आयुष्याची प्रॅक्टीकॅलीटी कळते interview
Biography
परीक्षा देत असताना आपल्याबरोबर असणारे लोक आपली निंदा करतात. पण तेच लोक परीक्षा पास झाल्यावर आपली वाहवा करतात. परीक्षा देतानाचा काळ हा संघर्षाचा असतो. तेव्हाच आपल्याला बऱ्या-वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते आणि याच काळात आपल्याला आयुष्याची प्रॅक्टीकॅलीटी कळते.... प्रामाणिक प्रयत्नाला फळ उशीर का होईना; पण भेटते नक्की... राहुल धस
वैयक्तिक माहिती
नाव : राहुल रावसाहेब धस
वय : 34 वर्षे
गाव : ऐरंड, ता. शेवगाव, जि. अहमदनगर
शिक्षण : बी.एस.एल., एल. एल. बी.
कामाचा अनुभव : लीगल फर्ममध्ये नोकरी
आत्तपर्यंत दिलेल्या स्पर्धा परीक्षा :MPSC / UPSC
निवड : MPSC महाराष्ट्रात DySP - 2
1) MPSC च्या परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत करिअर करण्याचे आपण का ठरविले?
एल. एल. बी. करताना मला जाणवले की या क्षेत्रात व्यापक प्रमाणात काम करण्याची संधी मिळते.
2) आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून गेलेला आहात, तर या प्रक्रियेबद्दल आपले काय मत आहे?
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी सातत्य गरजेचे आहे. दिवसातून 10-12 तास अभ्यास करण्यापेक्षा 7 ते 8 तास वेळ काढला तरी चालेल.
3) पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे?
पूर्व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपर-1 वरची कमांड आणि स्पीड महत्वाचा आहे.
4) मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी आपण रोज किती तास वेळ दिला? मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यावर केला की अगोदरच सुरु केला होता?
मुख्य परीक्षेचा अभ्यास निकाल लागल्यानंतर सुरू केला होता. दिवसातून 6-7 तास अभ्यास केला. UPSC परीक्षेची तयारी करण्याचा फायदा या परीक्षेसाठी झाला.
5) मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना अधिक महत्वाचे काय आहे? जास्तीत जास्त पुस्तके वाचणे की एकच पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करुन स्वत:चे नोटस् तयार करणे ?
MPSC परीक्षेसाठी नोटस् काढणे गरजेचे नाही. कमीत कमी पुस्तके वाचावी. ठराविक पुस्तके असावी. पण यासाठी रिव्हिजन करणे महत्वाचे आहे.
6) मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीला जाण्याअगोदर व मुलाखत झाल्यानंतर आपल्या मनात काय विचार आले होते?
मुलाखतीच्या दिवशी मुलाखतीचे प्रेशर घेतले नव्हते. पॅनेलमध्ये श्री. व्ही. एन. मोरे सर होते. मुलाखतीचे टेन्शन नव्हते. मुलाखतीमध्ये 70 मार्क मिळाले. मुलाखतीचा अनुभव होता. त्यामुळे भिती वाटत नव्हती.
7) आपणास मुलाखतीत कोणते प्रश्न विचारले गेले होते?
- 35 ते 40 मिनिटांची मुलाखत झाली.
- DYSP वर प्रश्न विचारले
- पोलिसांचे वर्क कल्चर कसे आहे.
- पैशाचे गैरव्यवहार
- DYSP झाल्यावर तुमचा फोकस एरिया काय असेल.
- पोलिस रिफॉर्म विषयी विचारले.
8) अंतिम निकाल जाहीर झाल्याचे आपणास कसे समजले व निकाल कळला तेव्हा आपल्याला काय वाटले? आपल्या यशाबद्दल आपल्या परिवाराची प्रतिक्रिया, त्यांच्या भावना काय आहेत?
अंतिम निकाल जाहीर झाल्याचे मित्राने कळवले. मला साईटवर निकाल दिसत नव्हता. मित्राने मोबाईलवरुन सक्रीन शॉट करुन रिझल्ट पाठवला तेव्हा खूप आनंद झाला. घरी फोन करुन कळवल्यावर घरचेही खूप खूश झाले.
9) आपल्या यशामध्ये कोणाचे मोलाचे योगदान आहे?
या यशामध्ये सगळ्यात महत्वाचे योगदान वडिलांचे आहे. त्याचबरोबर कुटुंबाचे योगदान ही भरपूर मोठे आहे. कारण यश मिळवायला उशीर झाला होता. MPSC परीक्षापूर्वी कधी दिली नव्हती. पण UPSC परीक्षा दिल्या होत्या. पण कुटुंबाचा पाठिंबा जास्त होता. त्यामुळेच हे यश मिळाले.
10) आपणास परीक्षेची तयारी करीत असताना बरेच गोड-कडू अनुभव आले असतील की ज्यांच्यामुळे आपणास बरेच काही शिकावयास मिळाले. असा एखादा अनुभव वाचकांना सांगता येईल का?
परीक्षा देत असताना आपल्याबरोबर असणारे लोक आपली निंदा करतात. पण तीच लोक परीक्षा पास झाल्यावर आपली वाहवा करतात. परीक्षा देतानाचा काळ हा संघर्षाचा असतो. तेव्हाच आपल्याला बर्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते आणि याच काळात आपल्याला आयुष्याची प्रॅक्टीकॅलीटी कळते.
11) वाचकांसाठी आपला संदेश काय असेल?
आयुष्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट ठरवल्यावर ती सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर आपल्याला यश हे निश्चितच मिळणार. आपल्या पदरी निराशा कधीच पडत नाही.