Vishal Arun Naikwade
'Study Distraction'खूप आहेत परंतु 'स्वतःवर नियंत्रण'ठेवले पाहिजे, तुमचा कोअर ग्रुप छोटा ठेवा आणि'Keep The Main Thing Main'. ... यश सहजासहजी मिळत नाही ... विशाल नाईकवाडे
Biography
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना'Patience'आणि 'अभ्यासातील सातत्य' या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. 'Study Distraction'खूप आहेत परंतु 'स्वतःवर नियंत्रण'ठेवले पाहिजे, तुमचा कोअर ग्रुप छोटा ठेवा आणि'Keep The Main Thing Main'. ... यश सहजासहजी मिळत नाही ... विशाल नाईकवाडे
नाव: विशाल अरुण नाईकवाडे
पद: तहसीलदार
शिक्षण :BSc. Agri
मंत्रालयात पर्यावरण विभागात 'सहायक कक्ष अधिकारी' या पदावर काम करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
दिलेल्या परीक्षा: UPSC मुख्य परीक्षा २०१० मुलाखतीस अपात्र
पूर्व परीक्षा :140 मुख्य परीक्षा : ४००
१. तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुम्ही केंव्हा पासून या क्षेत्राकडे वळला?
- मूळ गाव-उंदरगाव,माढा,सोलापूर. शिक्षण- B.Sc AGRI
- 2010 पासून याक्षेत्राकडे वळालो मात्र मनाने डिग्री पासूनच सुरवात केली होती.
२. प्रत्येकाला अभ्यासक्रम माहित असतो, पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. तर तुम्ही study distraction आणि mood swingers वर कसे control ठेवला ?
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना'Patience'आणि 'अभ्यासातील सातत्य' या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत.'Study Distraction'खूप आहेत परंतु 'स्वतःवर नियंत्रण'ठेवले पाहिजे, तुमचा कोअर ग्रुप छोटा ठेवा आणि'Keep The Main Thing Main'. सर्वच दिवशी पूर्ण वेळ तुमचा चांगलाचअभ्यास होईल असे नाही, पण जेंव्हा अभ्यास करत असाल तेंव्हा अभ्यासच कराम्हणजेइतर गोष्टी एन्जॉय करत असतानाअभ्यासाचे टेन्शन येणार नाही.अभ्यासाचा मूड नसेल तेंव्हा एखादे चांगले पुस्तक,चांगला picture,एखादा ट्रेककेल्यास सकारात्मक energy भेटेलआणि तुम्ही recharge व्हाल. Facebook, whatsapp या गोष्टींचा कमीत कमी वापर करा या गोष्टींचा जेवढा फायदा होतो त्यापेक्षा तोटे जास्त आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना बऱ्याचदा insecurity feel होते, काही वेळा अपयश आल्यास एकलेपणाची जाणीव होते अशावेळी कुटुंबातील सदस्यांशी, मित्रांशी, कोणी मार्गदर्शक असल्यास त्यांच्याशी संवाद साधल्यास फायदा होतो. दररोज सकाळी व्यायाम केल्यास मूड स्विंग वर कंट्रोल ठेवता येईल.
३. MPSC च्या बदलत्या प्रश्नबाबत काही comment?
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मुळे प्रश्नाचे स्वरूप जास्तीत जास्त फॅक्टस ओरिएंटेड होत आहे. काही प्रश्न 'गतिरोधक'स्वरूपाचे असतात त्यात वेळ न घालवणे हेच शहाणपणाचे. प्रश्नाचे सखोल विश्लेषण करून त्याचे सोर्सेस जाणून घेऊन त्यांच्या जास्तीत जास्त जवळ जात येईल.
४. तुम्ही कोणती test series लावली होती का? Exam पास होण्यासाठी ती कितपत गरजेची ठरते?
Test Series लावली नव्हती. परंतु लावल्यास ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवण्याच्या सरावाचा फायदा होईल. टेस्ट series लावल्यास अभ्यासाचेआणि टेस्ट series चे वेळापत्रकसारखे असावे.
५. या परीक्षां मधील नवखे, जुन्या लोंकाना घाबरतात आणि न्यूनगंड तयार होतो. परीक्षेच्या दृष्टीने तुमचा Approachकसा होता?
जुन्या लोकांनासहाजिकच त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो, परंतु वारंवार बदलणाऱ्या पॅटर्न,प्रश्नच्यास्वरूपामुळे त्यांचे तितके advantage राहिले नाही असे मला वाटते. त्यामुळे आपली स्पर्धा स्वतःशीच आहे असे मानून कोणताही न्यूनगंड न बाळगता परीक्षेला सामोरे जावे.
६. तुम्ही जर select झाला नसता, तर तुमचा काही Backup Plan होता का?
असा विचार कधी केला नाही. No 'Plan B'
७. या संघर्ष आणि सफलतेच्या प्रवासात तुम्ही खूप काही शिकला असाल. नवीन मुलं/मुलींसाठी तुमचा काही सल्ला ?
संयम,सातत्य,आणि सकारत्मक रहा यश नक्की मिळेल. दरदिवशी पुण्यात हजारो मुलं अभ्यासासाठी येत आहेत,सुरवातीच्या काळात कोणीतरी वाटाड्या भेटणं खूप महत्वाचे आहे. नाहीतर आपली अवस्था दिशाहीन वारू सारखी होईल. जुन्या अनुभवी लोकांच्या सानिध्यात रहा त्यांनी केलेल्या चुका टाळा, सुरवातीचा काळात खूप उत्साह आणि energy असते हा काळ पाया भरणीचा असतो, या काळातील तुम्ही घेतलेल्या परिश्रमावरच तुमची यशाची इमारत उभी राहणार आहे किंवा कोसळणार आहे, या काळात स्वतःला अभ्यासात झोकून द्या.प्रोफेशनल व्हा.
८. तुम्ही जॉब करत अभ्यास केला. असलेला वेळेचे नियोजन कसे करायचे याबद्दल काही सांगू शकाल का?
जॉब करत असताना सारख्या परीक्षेचा अभ्यास करणारे पार्टनर घ्यावेतत्यामुळे तुम्ही sideline होणार नाहीत तसेचअभ्यासाचे work divisionकरता येईल तसेच संध्याकाळीअभ्यासाची चर्चा करता येईल, जॉब करत असताना आपल्या बॉस शी चांगले संबंध ठेवा आणि त्यांना आपण आजून तयारी करत असल्याची सुरवातीलाच कल्पना द्या, त्यांना तुमच्या परीक्षा कधी आहेत त्या काळात तुम्ही रजेवर जाणार आहात हे सांगा त्या अगोदर तुम्हाला तुमच्या ऑफिस मधील महत्वाची कामे उरकता येतील. दुसऱ्या आणि चवथ्या शनिवार ला जोडून रजा घेतल्यास तुम्हाला सलग 3 दिवस अभ्यासास मिळतील. जॉब करत असताना पूर्णवेळ अभ्यास करत असणाऱ्यालोकांशी नेहमी संपर्कात रहा. ऑफिस ला जाताना प्रवासात काही ऑडिओ नोट्स, शॉर्ट नोट्स, चार्टस, नेहमी सोबत ठेवा त्या चाळत रहा ऑनलाइन मटेरियल वाचा, व्हाट्सऍप ग्रुपचा चांगला वापर प्रवासात करता येईल.
९. MPSC Pre मध्ये score करणं खूप कठीण झालाय. हा महत्वपूर्ण टप्पा कसा पार करावा, याबद्दल काय सांगाल?
MPSC परीक्षेत सर्वात जास्त स्पर्धा आणि अनिश्चितता पूर्व परीक्षेच्या टप्यावर असते. आपली मजबुत स्थाने कोणती GS की CSAT हे सुरवातीला ओळखता आले पाहिजे आणि तो पार्ट आणखीन मजबूत करून कमी पडत असलेल्या भागावर मिनिमम average स्कोर केला पाहिजे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम मुख्य परिक्षे सारखा विस्तृत नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त वाचन आणि रिवीजन हेच सूत्र कामी येईल, GS मध्ये सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी हे घटक जास्त मार्क्सवाले आहेत त्यांच्यावर मेहनत घेतल्यास फायदा होईल.
१०. खूप जणांचे यावर मतांतर आहे कि, MPSC Mains मध्ये किती प्रश्न attempt करावे? तुमचे मत काय आहे?
MPSC मुख्य परीक्षेत येणारे केवळ 40% प्रश्न आपल्यालावाचलेले,माहितीतले असतात. मुख्य परीक्षेत 135पर्यंत attempt करावा त्यापेक्षा कमी करु नये असे माझें वैयक्तिक मत आहे. सोडवलेल्या प्रश्नत तुम्ही कंफोर्ट झोन मध्ये आहात असे वाटत असल्यास attempt वाढवू शकता. बऱ्याच यशस्वी विद्यार्थ्यांचा attempt 135 किंवा जास्त होता असे दिसून येते.
११. पूर्व आणि मुख्य परीक्षा यामधील काळातील अभ्यासाविषयी तुम्ही काय सांगाल?
पूर्व परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी पासून अभ्यासास लागावे. यासाठी पूर्व परीक्षेत चांगला स्कोर येणं हे महत्वाचं आहे. पूर्व परीक्षेत चांगला स्कोर आल्यास निकालाची काळजी राहणार नाही. ग्रुप discussion वर भर द्यावा.
१२. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही चुका केल्या असं वाटतंय का, कि ज्यामुळे यश थोडा वेळ लांबला.?
खूप चूका केल्या आणि वारंवार केल्या हि सर्वात मोठी चूक, चुका पासून शिकलं पाहिजे, ती चूक परत व्हायला नको.
१३. भाषेचा पेपर नेहमी दुर्लक्षित राहतो. त्यावर किती व कसा भर द्यायचा?
बदलेल्या पॅटर्न नुसार मराठी-इंग्लिश हे खूप खूप crucial राहतील. मराठी-इंग्लिश हेच पोस्ट ठरवतील. ऑब्जेक्टिव्ह पेपर खूप स्कोअरिंग आहे त्याचा नियमित सराव करावा PSI-STI-Asst या परीक्षा फोकस करणाऱ्या विद्यार्थीयेथे सरस ठरतील, मो.र.वाळिंबे आणि रामदास वाघ या पुस्तकांची पारायणे करून जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत.
१४. तुम्ही Revision साठी स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या का.? त्याची कितपत गरज आहे.?
विषयवार मायक्रो नोट्स , चार्ट, निमोनिकस बनवल्या होत्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत खूप महत्वाचे.परीक्षेच्या काळात रिविजन ला प्रचंड फायदा होतो.