Rohini dattatreya Narhe
IT मधील नोकरी, ५ वर्षांची मुलगी, एक Stable life असताना हि MPSC करण्याचा निर्णय घेणं आणि राज्यात मुलींमधून पहिला येणं यासाठी लागते अचूक नियोजन आणि त्याचा Execution ...सांगत आहेत रोहिणी नर्हे. interview
Biography
नाव: रोहिणी दत्तात्रय नऱ्हे
पद: नायब तहसीलदार
शिक्षण:
10th: म. गांधी विद्यालय रा. नगर
12th: Feugsson college Pune
B. Tech (E & TC) (8.34/10 COPA)
अनुभव:
Tata Consultancy Services Ltd. Pune (2007-2014)
दिलेल्या परीक्षा:
2013 - Pre-Pass , Mains – इंटरव्यू Call – 2 मार्क्स ने गेली
* 2014 - Pre, Mains Pass - पास select – Missed By 10 मार्क्स
१. तुमच्याविषयी थोडक्यात सांगा, तुम्ही केंव्हा पासून या क्षेत्राकडे वळला?
सात वर्षाच्या IT च्या जॉबमधील सुरवातीची 5 वर्ष प्रशासकीय सेवेत जाण्याचा विचार कधीच केला नाही परंतु काम करत असताना असे नेहमी जाणवायचे की आपले काम स्वतःपुरते किंवा कंपनीपुरते मर्यादित राहत आहे.
शिवाय सासर व माहेर दोन्हीकंडुन पार्श्वभुमी ग्रामीण व शेतकरी कुंटुबातील आहे.सर्वसामान्याच्या प्रश्नाची व शेतकरी कुंटुबातील आहे सर्वसामान्याच्या प्रश्नाची जाण आणि त्यांच्यासाठी आपल्या शिक्षणाचा व अनुभवाचा वापर करण्याची मनोमन इच्छा होती. यात पतीनी आणि एकंदरित सर्वांनी माझ्या प्रशासकीय सेवेत करिअर करण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे मी मला 5 वर्षाची मुलगी असताना आणि IT मध्ये स्थिरस्थावर झालेले असताना राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात धाडसी निर्णय घेतला.
२. प्रत्येकाला अभ्यासक्रम माहित असतो, पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. तर तुम्ही study distraction आणि mood swingers वर कसे control ठेवला ?
जर आपले ध्येय आणि प्लँनिंग नसेल तर जास्त mood swinger होऊ शकतात. प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत आणि ability वेगळी असते, त्यामुळे त्यावर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. स्वतःचे time table बनवा आणि ते पाळा, स्वतःशी बोला आणि दरवेळी आपण ठरवलेल्या नियोजनाचे analysis करा. Successful लोकांना पण प्रॉब्लेम येतात, त्यामुळे प्रॉब्लेम येणे हि एक साधारण गोष्ट आहे त्याचा जास्त बाऊ करण्याची गरज नाही. यासाठी ध्यान, योग, व्यायाम करा. 'विचारनियम'- सर श्री, सेक्रेटस, अल्केमिस्ट, विवेकानंद यांची/यासारखी पुस्तके पण वाचा.
३. MPSC च्या बदलत्या प्रश्नबाबत काही comment?
आयोगाने अभ्यासक्रम दिला आहे. त्यामुळे fundamentals clear ठेवा. वाचन बरोबर उजळणी चा प्लॅन तयार पाहिजे. काळाप्रमाणे बदलणे हि या परीक्षेची गरज आहे, त्यामुळे स्वतःच्या तयारीत बदल करा.
४. तुम्ही कोणती test series लावली होती का? Exam पास होण्यासाठी ती कितपत गरजेची ठरते?
Test series हि गरजेची आहे, आपण किती attempt करू शकतो? १-२ राऊंड करू शकतो का? कशावर भर द्यायचा? हे समजते आणि त्याप्रमाणे स्ट्रॅटेजि बनवता येते.
५. या परीक्षां मधील नवखे, जुन्या लोंकाना घाबरतात आणि न्यूनगंड तयार होतो. परीक्षेच्या दृष्टीने तुमचा Approach कसा होता?
Ignorance is bliss जे माहित नाही ते चांगलेच आहे म्हणतात, त्याप्रमाणे नवीन मुलांना नेमके परीक्षेसाठी काय पाहिजे, एवढा कळलं तरी ते चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतात. 1st energy चांगली असते, त्यामुळे अभ्यास हि बिनधास्त आणि thoroughly होतो. त्यामुळे नवीन मुलांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.
६. तुम्ही जर select झाला नसता, तर तुमचा काही Backup Plan होता का?
Backup plan होता, मी private job जॉईन केला असता. आणि जर जॉब भेटला नसता तरी मी एक उत्तम गृहिणी झाले असते. Home maker होणे हि सुद्धा मोठी जबाबदारी आहे. आपल्या आईने जर घर व्यवस्थित सांभाळले नसते तर मी आत्ता या ठिकाणी पोहचू शकले नसते. सुशिक्षित गृहिणी नेहमी कुटुंबाला पुढे घेऊन जाते. घरातील व्यवहार आणि उद्योग हि व्यवस्थित सांभाळला जाऊ शकतो. त्याला मानधन भेटत नाही म्हणून त्या कामालाही कमी लेखून चालणार नाही.
७. या संघर्ष आणि सफलतेच्या प्रवासात तुम्ही खूप काही शिकला असाल. नवीन मुलं/मुलींसाठी तुमचा काही सल्ला ?
i) There are very few who can run behind their dreams and you are one of those lucky people.
ii) Civil services is not for glamour, it is for the society. So understand the role/position i.e. leadership, you are going to spend years for study.
iii) If you pass, well and good
Even if you don’t, nothing to lose out. You will definitely do any career in life in an outstanding manner once you prepare for civil services. So enjoy studying!!
८. तुम्ही जॉब करत अभ्यास केला. असलेला वेळेचे नियोजन कसे करायचे याबद्दल काही सांगू शकाल का?
2013 चा attempt job करत असताना दिला You must have habit of stealing the time if you are working and study should be target based and quality oriented. यावेळी तुम्हाला excuse मिळत नाही. त्यामुळे स्वतः वेळ पाळला पाहिजे, आणि काटेकोर नियमाने तो अमलात आणला पाहिजे.
९. MPSC Pre मध्ये score करणं खूप कठीण झालाय. हा महत्वपूर्ण टप्पा कसा पार करावा, याबद्दल काय सांगाल?
CSAT आणि GS यामध्ये बॅलन्स करता आला पाहिजे. कमी मार्क पडणारे शक्यतो CSAT मध्ये मागे राहतात.
१०. खूप जणांचे यावर मतांतर आहे कि, MPSC Mains मध्ये किती प्रश्न attempt करावे? तुमचे मत काय आहे?
1. ज्या प्रश्नाचे उत्तर.
a) Either 100 % माहिती आहे – 4 पैकी 1
b) Or 50% eliminate होत आहेत – 4 पैकी 2
असेच प्रश्न attempt करावे भले attempt कमी आला तरी चालेल.
2. 50% eliminate होणारे Q – सोडवताना – थोडा logic चा वापर करावा उत्तर काय असु शकते या पेक्षा काय असु शकते हे ठरवा.
3. वरील 1 व 2 साठी –
i) Conceptual understanding
1. ज्या प्रशांनचे उत्तर.
a) Either 100 % माहिती आहे – 4 पैकी 1 100 % माहित आहे.
b) 50% eliminate होत आहेत – 4 पैकी 2 प्रश्न बाद होत आहेत.
असे प्रश्न attempt करावे भले attempt कमी आला तरी चालेले.
2. 50% eliminate होणारे Q – सोडवताना – थोडा logic चा वापर करावा उत्तर काय असु शकते या पेक्षा काय नसु शकते हे ठरवा.
3. वरील 1 व 2 साठी –
I ) conceptual understanding
II) Revision
III) मागचे Q paper analysis यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
११. पूर्व आणि मुख्य परीक्षा यामधील काळातील अभ्यासाविषयी तुम्ही काय सांगाल?
मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवूनच पूर्व चा अभ्यास करा. प्रत्येक विषयासाठी २/३ संदर्भ ठेवा. जास्तीत जास्त उजळणी झाली पाहिजे. उजळणी साठी वेळ राखून ठेवा.
१२. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही चुका केल्या असं वाटतंय का, कि ज्यामुळे यश थोडा वेळ लांबला?
एक म्हणजे उजळणी कमी पडली. समजा जर मी ग्रोवर वाचलंय आणि उजळणी नाही केली तर माझे वाचनाचे आधीचे दिवस पण वाया गेल्या सारखे आहेत. वाचनावर तुमची command आली पाहिजे. भाषा विषयाला हि तितकेच महत्व दिले पाहिजे.
१३. लग्न झालेल्या मुली अभ्यास सोडतात किंवा नंतर अभ्यासाचे नियोजन करायला चुकतात. त्यांना तुम्ही काय सांगाल?
लग्न झालेल्या मुलींनी हा निर्णय घेताना खरतर सर्व कुटुंबाने मिळून decision घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला खूप support लागतो, हा support बोलून मिळवा. तुम्हालाही खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता मोकळा वेळ आहे म्हणून परीक्षा देतो असं व्यहला नको. जेंव्हा तुमची मेहनत दिसते तेंव्हा बाकीचे पण तुम्हाला मदत करतात.
१४. भाषेचा पेपर नेहमी दुर्लक्षित राहतो. त्यावर किती व कसा भर द्यायचा?
भाषे कडे नेहमी मार्क्स आणि GS म्हणून बघितले पाहिजे. आपण या अविर्भावात असतो कि मला भाषा लगेच जमेल, पण तसे होत नाही.
१५. तुम्ही Revision साठी स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या का.? त्याची कितपत गरज आहे.?
Notes अनुभवातून तयार होतात. त्या Last Minute वाचता आल्या पाहिजेत. त्या Micro Notes असाव्यात ज्यातून क्लिअर picture उभं राहील.