शितलेश बाबासाहेब गाडे


Contact Member

shital babasaheb gade

सहायक विक्रीकर आयुक्त

लोकांना success फक्त post मिळाली की दिसतो पण न दिसणारा फायदा ही खुप मोठा आहे. आपण या क्षेत्रामध्ये खुप काही शिकतो आणि ते खुप महत्वाचा आहे. स्वतःला ओळखून स्वतः मध्ये काही बदल करता येत असतील तर ते जरूर करा interview


Biography

लोकांना success फक्त post मिळाली की दिसतो पण न दिसणारा फायदा ही खुप मोठा आहे. आपण या क्षेत्रामध्ये खुप काही शिकतो आणि ते खुप महत्वाचा आहे. स्वतःला ओळखून स्वतः मध्ये काही बदल करता येत असतील तर ते जरूर करा. प्रत्येकाची story वेगळी असते ती तंतोतंत स्वतःला लागु करू नका.....सांगत आहेत STI शितलेश गाडे

नाव :शितलेश बाबासाहेब गाडे

पद: Sales Tax Inspector

शिक्षण: B. Pharmacy

अनुभव: no any experience

Details of other competitive exams success/ failure:

Success- Intelligence bureau ACIO December 2012

Assistant section officer 2015

Sales tax inspector 2014

Failure- State service mains 2012- 385 marks

state service mains 2013- 360 marks

sales tax inspector 2012 - 230 ( selected but not recommended)

UPSC mains 2015

Assistant commandant physical

STI Prelims score: 44

STI Mains Score: 108

Final score: 108


१. तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुम्ही केंव्हा पासून या क्षेत्राकडे वळला?

2011 साली मी B फार्मसी च शिक्षण पूर्ण केल आणि जून 2011 पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय.PSI बनायच म्हणून या field मध्ये आलो पण आज मी upsc mains दोनदा दिली सध्या upsc च preparation चालू आहे. . intelligence bureau मध्ये select झालो होतो पण join केल नाही.राज्यसेवा पहिल्या प्रयत्नात मेन्स ला ३८४ मार्क्स मिळाले, पण sectional cut off असल्याने .0.33 मार्क्स ने fail ज्हालो.2013 साली STI selected but not recommended. 2014 साली एक ही prelim पास झालो नाही.खुप critical मानसिक स्थितीतून गेलो अन 2015 साली STI , assistant section officer pass झालो.ह्या सगल्या प्रवासात मी point मार्क्स च महत्व अन थोडक्यात मिळणाऱ्या यशाची हुलकावणी अनुभवली. आजपर्यंत हे सगळं पुस्तकांमध्येच वाचत आलो होतो. परन्तु मी कधीच हार मानली नाही ,आज मी upsc च्या दिशेने वाटचाल करतोय आणि तिथेहि successful होणारच याचा मला पूर्ण विश्वास आहे.

 

२. प्रत्येकाला अभ्यासक्रम माहित असतो, पण त्यामध्ये सातत्य राहत नाही. तर तुम्ही study distraction आणि mood swingers वर कसे control ठेवला ?

 College life to career oriented होत असताना नवीन बदल accept करने गरजेच असते .बऱ्याच वेळा आपण तिथे कमी पडतो पण चूका समजुन घेतल्या. And i always discuss my problems with my close friend, so that i control my distractions and mood swings.मी नेहमीच study वर भर दिला ज्या चूका मी केल्या त्याचे analysis करत राहिलो अन study मधे सुधारणा करत गेलो. सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्टडी Enjoy केला.


३. MPSC च्या बदलत्या प्रश्नबाबत काही comment?

आपल्याला study plan बदलावा लागेल objectivity and concept दोन्ही चांगले करावे लागतील,तरच आपण questions tackle करू शकू. Practice makes man perfect. जास्तित जास्त question solve करावे ,previous year question papers ह्या साठी फायदेशीर ठरू शकतात.


४. तुम्ही कोणती test series लावली होती का? Exam पास होण्यासाठी ती कितपत गरजेची ठरते?

 नाही. It depends on individual person and ability. But my suggestion is try to solve previous year question paper analysis and try to understand the nature of questions.


५. या परीक्षां मधील नवखे, जुन्या लोंकाना घाबरतात आणि न्यूनगंड तयार होतो. परीक्षेच्या दृष्टीने तुमचा Approach कसा होता?

जुन्या लोकांसोबत interaction करायाला हवे ,परन्तु ती योग्य व्यक्ति असावी.जुन्या लोकांकडून शिकण्यासारख्या दोन गोष्टी असतात, एक म्हणजे ते सक्सेसफुल कसे बनले आणि ते फेल का झाले .त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन, यश्ववी होण्यासाठीच्या चूका टाळू शकतो.


६. तुम्ही जर select झाला नसता, तर तुमचा काही Backup Plan होता का?

हो plan B असणं गरजेच आहे, मी मेडिकल टाकणार होतो. plan B असन म्हणजे आपण हार मानली असे न्हवे तर ते एक प्रकारे प्रैक्टिकल असणे अन mature असण्याचे लक्षण आहे, आणि आत्ताचा success rate पाहता Plan बी जरुर ठेवावा.


७. या संघर्ष आणि सफलतेच्या प्रवासात तुम्ही खूप काही शिकला असाल. नवीन मुला /मुलींसाठी तुमचा काही सल्ला ?

लोकाना success फक्त post मिळाली की दिसतो पण न दिसणारा success ही खुप मोठा आहे. आपण ह्या क्षेत्रामध्ये खुप कही शिकतो आणि ते खुप important आहे. प्रयत्न करत रहा स्वतःशी आणि आपल्या study शी प्रमाणिक रहा. स्वतःला ओळखून स्वतः मध्ये काही बदल करता येत असतील तर ते जरूर करा. प्रत्येकाची story वेगळी असते ती तंतोतंत स्वतःला लागु करू नका.


८. तुम्ही जॉब करत अभ्यास केला का? असलेल्या वेळेचे नियोजन कसे करायचे याबद्दल काही सांगू शकाल का?

सध्या job करतच स्टडी करतोय, Office सुटले की 4 तास मिळतात ते अभ्यासासाठी वापरतो. Switch on and switch off होता आल पाहिजे. जेव्हा तुम्ही job करत study करता तेव्हा प्रत्येक minute महत्वाचा ठरतो, ह्या साठी micro notes सोबत ठेवणे,online material उपयोगी ठरू शकेल.


९. MPSC Pre मध्ये score करणं खूप कठीण झालाय. हा महत्वपूर्ण टप्पा कसा पार करावा, याबद्दल काय सांगाल?

मी स्वतः हा problem face करतोय. मला वाटतं, CSAT Important आहेच परंतु सोबतच GS ची ही तयारी हवी. stick to basics इथे कामी येऊ शकेल. Use limited references and need to use standard reference books instead of market material and notes.


१०. खूप जणांचे यावर मतांतर आहे कि, MPSC Mains मध्ये किती प्रश्न attempt करावे? तुमचे मत काय आहे?

Attempt पेक्षा accuracy important आहे अस मला वाटत. आपण सर्व च्या सर्व प्रश्न solve करण्याचा मोह आवरायला हवा.


११. पूर्व आणि मुख्य परीक्षा या मधील काळातील अभ्यासाविषयी तुम्ही काय सांगाल?

लवकरात लवकर study सुरु करावा, score काहिही असला तरी cut off बद्दल ची चर्चा avoid करावी. शांततेच्या काळात कष्ट घेतले की युद्धामध्ये कमी रक्त सांडते. हा अभ्यासच तुम्ही pass होण्याचा confidence वाढवू शकतो.


१२. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काही चुका केल्या असं वाटतंय का, कि ज्यामुळे यश थोडा वेळ लांबले ?

सुरुवातीला direction नीट भेटली नाही, standard reference book use केली नाहीत. English books अभ्यासासाठी वापरायला नको वाटतं परंतु नंतर English चा बाऊ दूर केला.मला वाटत study करताना language चा बाऊ करू नये. ज्य़ा गोष्टी आपणास येत नाहीत त्या शिकायला हव्या आणि exam च्या demand नुसार अपन flexibility ठेवायला हवी.


१३. लग्न झालेल्या मुली अभ्यास सोडतात किंवा नंतर अभ्यासाचे नियोजन करायला चुकतात. त्यांना तुम्ही काय सांगाल?

Family चा support ने study सुरू ठेवावा. मुलींना संधी आहे आणि त्यांनी ती वापरायला पाहिजे.


१४. भाषेचा पेपर नेहमी दुर्लक्षित राहतो. त्यावर किती व कसा भर द्यायचा?

व्याकरण वर हातकंडा असायला हवा. Standard reference बुक वापरावीत. वर्तमानपत्र, सिनेमा तसेच समाजत वावरत असतानाचे observation essay साठी फायदेशीर ठरू शकते. Own writing style असयाला हवी,नेहमी काही तरी लिहित रहावे.


१५. तुम्ही Revision साठी स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या का? त्याची कितपत गरज आहे?

स्वतःच्या hand writing मध्ये important गोष्टी लिहून काढल्या तर त्या जास्त लक्षात राहतात आणि revision ही fast होते.micro notes वरती भर द्या. Notes काढने ही एक process आहे, जसजशी तुम्ही study ची level वाढवाल तसे तुमच्या नोट्स refine and improve होत जातील तेव्हा तुम्ही micro नोट्स easily काढू शकाल.

;