Current Affairs

2 January 2017

शंकर बालसुब्रमण्यम यांना नाईटहूड

जन्माने भारतीय असलेले केम्ब्रिज विद्यापीठाचे डीएनए तज्ज्ञ व रसायनशास्त्राचे प्राध्यापक शंकर बालसुब्रह्मण्यम यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून नाईटहूड या किताबाने गौरविण्यात आले आहे. सध्या ते केम्ब्रिज विद्यापीठाच्या वैद्यकीय रसायनशास्त्र विभागात हर्शेल स्मिथ प्रोफेसर आहेत.

बालसुब्रह्मण्यम यांचे डीएनए संशोधनातील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी डीएनए क्रमवारी लावण्याच्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे. त्यांच्या या उलेखनीय कामगरीबद्दल त्यांना हा किताब देण्यात आला आहे.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वतीने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना नाइटहूड किताब दिला जातो.


शंकर बालसुब्रमण्यम यांचा अल्प परिचय

      • जन्म : ३० सप्टेंबर १९६६ रोजी चेन्नई येथे झाला व नंतर १९६७ मध्ये ते ब्रिटनला गेले.
      • केंब्रिज विध्यपीठातून पीएचडी
      • न्यूक्लिक अॅसिड मधील योगदानामुळे ते जगभर ओळखले जातात
      • सध्या ते केंब्रिज विद्यापीठात रसायन शास्त्राचे प्राध्यापक आहेत.
      • डीएनए क्वाड्राप्लेक्सेसचा कर्करोगातील संबंध त्यांनी जोडून दाखवला व एपिजेनिटिक बदलावर नवीन प्रकाश टाकला होता. सर शंकर बालसुब्रह्मण्यम हे रॉयल सोसायटीचे फेलो असून ते जन्माने भारतीय असलेले ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ आहेत.
      • ब्रिटनमधील केम्ब्रिज संस्थेत ते कर्करोग संशोधन गटाचे प्रमुख आहेत व ट्रिनिटी कॉलेजचे फेलोही आहेत.
      • केम्ब्रिज एपिजेनेटिक्स व सोलेक्सा यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा आहे.
      • त्यांना यापूर्वी टेट्राह्रेडॉन पुरस्कार, कोर्ड-मार्गन पुरस्कार, मलार्ड ग्लॅक्सो वेलकम पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत.

भारतीय ज्ञानपीठ नवलेखण पुरस्कार २०१६


दोन हिंदी लेखक श्रद्धा आणि घनश्याम कुमार देवांश यांची २०१६ साठीच्या भारतीय ज्ञानपीठ नवलेखन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

श्रद्धा यांची ‘हवा मे फडफडाती चिठी’ या लघुकथेसाठी तर देवांश यांची ‘आकाश मे देह’ या कवितेसाठी निवड करण्यात आली आहे.

प्रसिद्ध कवि विष्णु नागर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची निवड केली आहे.


भारतीय ज्ञानपीठ नवलेखन पुरस्काराबद्दल


      • हिंदीमध्ये लेखन करणार्‍या युवा लेखकांना त्यांच्या पहिल्या निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
      • भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट कडून २००६ मध्ये या पुरस्करची स्थापना करण्यात आली.
      • सरस्वतीची मूर्ति, प्रशस्तीपत्र आणि रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


‘हज कमिटी ऑफ इंडिया’ मोबाईल ॲप


केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते २ जानेवारी २०१६ रोजी मुंबई येथे हज हाऊसमध्ये ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ या मोबाईल ॲपचा प्रारंभ करण्यात आला आहे.

नवीन ॲपच्या माध्यमातून हज यात्रेसाठी थेट अर्ज भरता येणार असून ‘ई-पेमेंट’ची महत्वपूर्ण सुविधाही ॲपवर उपलब्ध आहे.


हज यात्रा म्हणजे काय ?


हज या शब्दाचा अर्थ आहे पवित्र स्थानाला भेट देणे. सौदी अरेबियातील मक्का या शहरात हज यात्रा भरवली जाते. इस्लामी कॅलेंडरचा 12 वा महिना म्हणजे अल-हिज्जाह या महिन्यात भरणारी ही यात्रा प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात एकदा तरी करावी, असं कुरानमध्ये म्हटलं आहे. हज यात्रा ही इस्लामच्या पाच आधारस्तंभांमधील एक आहे. ते पाच आधारस्तंभ म्हणजे : 1. एकेश्वरत्व आणि प्रेषितत्व यांची ईश्वरासमोर साक्ष देणे. 2. नमाज प्रस्थापित करणे. 3. जकात अदा करणे. 4. रमजान महिन्यामध्ये उपवास (रोजे) करणे. 5. हज यात्रा करणे. 


अग्नी-4 ची यशस्वी चाचणी


आण्विक क्षमता असलेल्या अग्नी-४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची भारताने २ जानेवारी २०१६ रोजी यशस्वी चाचणी घेतली आहे.

ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम बेटावर स्ट्रटेजिक फोर्सेस कमांडने एका रोड-मोबाईल प्रक्षेपकावरून अग्नी-4 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

;