Current Affairs

10 January 2017

10 जानेवारी : जागतिक हिन्दी दिवस

दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस जगभरामध्ये जागतिक हिन्दी दिवस साजरा केला जातो. या दिवशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कार्यालयीन भाषा विभाग विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. जागतिक हिन्दी दिवस पहिल्यांदा 10 जानेवारी 2006 रोजी साजरा करण्यात आला होता.

राष्ट्रीय हिन्दी दिवस 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने हिन्दी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकार केला होता. हिन्दी ही जगामधील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगभरातील सुमारे 258 दशलक्ष लोकांची ही मातृभाषा आहे. राज्यघटना कलम 120, 210, 343, 344, 348 ते 351 मध्ये हिन्दी भाषेविषयी तरतूद आहे. फिज्जी या पॅसिफिक महासागरातील देशनेही हिन्दीचा कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकार केला आहे.

फिफा फुटबॉल पुरस्कार

पोर्तुगीज फुटबॉलपट्टू क्रिस्टीनो रोनाल्डो यांना 2016 साठीचा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपट्टू पुरस्कार देण्यात आला आहे. रोनाल्डोला 34.54% मते मिळाले असून त्यांनी मेस्सीला मागे टाकले आहे.

अन्य पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट फिफा महिला खेळाडू - कर्ली लॉयडल (अमेरिका)
  • सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष प्रशिक्षक - क्लौडिओ रेनिरी (इटली)
  • सर्वोत्कृष्ट फिफा महिला प्रशिक्षक – सिल्विया नेईड (जर्मनी)

इस्रो आणि फ्रेंच स्पेस एजन्सीमध्ये करार

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि फ्रेंच स्पेस एजन्सीदरम्यान (CNES) उपग्रह प्रक्षेपण तंत्रज्ञांनासंबंधी नुकताच करार झाला आहे. या करारावर इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार आणि CNES चे अध्यक्ष जिन-वेस ली गल्ल यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. इस्रो ही CNES ची नासा नंतर सर्वांत मोठी भागीदार असून या करारामुळे त्याला बळकटी मिळणार आहे.

20 वर्षांत पहिल्यांदाच हरियाणाचे लिंग गुणोत्तर 900 च्या वर

हरियाणाचे डिसेंबर 2016 मध्ये जन्माच्या वेळी बाल लिंग गुणोत्तर 914 असून मागील दोन दशकांमधील राज्याचा हा सर्वोच्च आकडा ठरला आहे.
2011 च्या जनगणणेनुसार हरियाणाचे बाल लिंग गुणोत्तर 834 होते जे देशातील सर्वांत कमी बाल लिंग गुणोत्तर असलेले राज्य आहे.
केंद्र सरकारने बेटी पढाओ बेटी बचाओ आंदोलन हरियनमधून सुरू केले होते.

जगातील सर्वांत मोठा पथ दिवे कार्यक्रम

  • केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जगातील सर्वांत मोठ्या पथ दिवे कार्यक्रमाचे दक्षिण दिल्ली येथे अनावरण केले असून हा LED आधारित राष्ट्रीय पथ दिवे कार्यक्रमाचा भाग आहे.
  • LED आधारित राष्ट्रीय पथ दिवे कार्यक्रमाच्या माध्यमातून दक्षिण दिल्लीतील महानगर पालिका क्षेत्रामध्ये 2 लाख पथ दिवे बदलून त्याजागी LED आधारित दिवे बसविण्यात आले आहेत.
  • यामुळे 2.65 कोटी kWh बचत आणि 22,000 टन हरित ग्रह वायूचे उत्सर्जन कमी होणार आहे.
  • LED आधारित राष्ट्रीय पथ दिवे कार्यक्रम महाराष्ट्रासह 15 राज्यांमध्ये सुरू आहे.
  • LED बल्बचे आयुष हे साधारण बल्बच्या 50 पट तर CFL बल्बच्या 8-10 पट आहे. या बल्बमुळे ऊर्जेची तसेच पैशाचीही बचत होते.

नोबेल पुरस्कार मालिका प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नोबेल पुरस्कार मालिका प्रदर्शनाचे उद्घाटन गांधीनगर (गुजरात) येथे केले असून भारतात आयोजित करण्यात आलेली याप्रकरची ही पहिलीच बैठक आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन नोबेल मीडिया आणि जैवतंत्रज्ञान विभागामार्फत करण्यात आले आहे.

9 नोबेल विजेत्यांचा यामध्ये सहभाग होता. त्यांनी भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या 9 नोबेल विजेत्यामध्ये डॉ. व्यंकटरमन रामकृषणन यांचा सहभाग आहे. त्यांना 2009 मध्ये रायबोझोमच्या रचनेबद्दल रसायनशास्त्राचा नोबेल [पुरस्कार मिळाला होता.
नोबेल पुरस्कार मालिका 2017 हे पाच आठवड्यांचे विज्ञान प्रदर्शन आहे.

;