14 January 2017
सुरजितसिंग बर्नाला यांचे निधन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला यांचे 14 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. अकाली दलातील नेमस्त नेते म्हणून ते ओळखले जातात. राजीव-लोंगोवाल करार झाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री झाले होते. बर्नाला हे 1985 ते 1987 दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री होते. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व उत्तरखंडचे ते 2001 ते 2011 दरम्यान राज्यपाल होते. 1942 च्या चाळेजव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. 1977 मध्ये ते संसदेवर निवडून गेले. मोरारजी देसाई यांच्या मंत्री मंडळात कृषि खात्याचे मंत्रिपद त्यांनी सांभाळले. त्यादरम्यान त्यांनी बांग्लादेश बरोबरच्या 1978 मध्ये गंगा पाणीवाटप करारावर स्वाक्षरी केली. 1997 मध्ये भाजप व मित्र पक्षांचे ते उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. 1998 च्या वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रात खत व रसायन मंत्री पद भूषविले. अमृतसरच्या गुरु नणक देव विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. 1969 मध्ये राज्याचे शिक्षणमंत्री असताना या विद्यापीठाची स्थापना केली. तामिळनाडूचे तीन वेळा राज्यपाल याखेरीज उत्तराखंडचे पहिले राज्यपाल, आंध्र प्रदेश, ओदिशा, पुद्दुचेरीच्या राज्यपाल पदाची धुरही त्यांनी सांभाळली. त्यांचा थोरला मुलगा जसजीतसिंग आम आदमी पक्षात आहे.
विदर्भ मिरर : श्रीहरी आणे यांनी विदर्भ मिरर हे साप्ताहिक सुरू केले आहे.
विल्यम ब्लॅटी यांचे निधन
लेखल व चित्रपट निर्माते विल्यम ब्लॅटी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांची ‘द एक्सोर्सिस्ट’ ही कादंबरी व त्याच नावाचा ऑस्कर विजेता चित्रपट गाजला होता. डियर टीनएजर, विच वे टू मक्का जॅक, जॉन गोल्डफार्ब, प्लीज कम होम, आय बिली शेक्सपियर व ट्विंकल ट्विंकल किलर केन हि पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांची लीजन ही कादंबरी द एक्सोर्सिस्टचा पुढचा भाग होता.
चीन रोमनायझेशनचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे निधन
आधुनिक चीनच्या पिनयीन रोमनायझेशन प्रणालीचे जनक झोयू योऊग्वान्ग यांचे वयाच्या 111 व्या वर्षी निधन झाले. चीनमधील अखेरच्या साम्राज्य घराणेशाहीच्या राजवटीत 1906 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. शांघायमधील सेंट जॉन विध्यपीठात पाश्चिमात्य शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत वॉल स्ट्रीट येथे काम केले.
गुजरात पहिल्यांदाच रणजी विजेता
कर्णधार पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली गुजरातने पहिल्यांदाच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपदक मिळविले आहे. गुजरातने मुंबईच्या संघाला पराभूत केले आहे. रंजीचा अंतिम सामना खेळण्याची गुजरातची ही दुसरी वेळ होती यापूर्वी 1950-51 मध्ये गुजरातला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. 1950-51 मध्ये होळकर संघाने त्यांचा पराभव केला होता.
काही वैशिष्ट्ये
बेरोजगारांमध्ये पडणार 2 लाखांची भर : जागतिक कामगार संघटना
देशातील बेरोजगारांची संख्या यावर्षी एक लाखांनी वाढण्याची शक्यता असून, 2018 मध्ये त्यात आणखी दोन लाखांची भर पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज जागतिक कामगार संघटनेने वर्तवली आहे. जागतिक कामगार संघटनेने 'जागतिक रोजगार आणि सामाजिक आढावा' शीर्षकाखाली अहवाल प्रकाशित केला आहे.
अहवालातील महत्त्वाची मुद्दे