3 January 2017
बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे निधन
कलात्मक समीक्षेची परंपरा सुरू करणारे बुकर पुरस्कार विजेते कांदबरीकार जॉन बर्जर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ‘G’ हे एकाक्षरी शीर्षक असलेल्या कादंबरीसाठी त्यांना १९७२ मध्ये मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता. पुरस्काराच्या मिळालेल्या रकमेपैकी अर्धे मानधन 'द ब्लॅक पँथर्स' या आफ्रिकन-अमेरिकन चळवळीसाठी त्यांनी दिले. मार्क्सवादी मर्मज्ञ म्हणून ओळखले जाणारे बर्जर यांच्या 'वेज ऑफ सीईंग' या 'बीबीसी'वरील मालिकेतून कलात्मक समीक्षेमध्ये एक राजकीय दृष्टीकोन आणला.
डेविड आर. सिम्लिह यूपीएससीच्या अध्यक्षपदी
आंध्रप्रदेशची एनटीआर आरोग्य रक्षा योजना
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जनतेला वैद्यकीय उपचार पुरविण्यासाठी एनटीआर आरोग्य रक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये १०४४ आजारांचा समावेश करण्यात आला असून २ लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार करता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरडोई वर्षाला १२०० रुपयाचा प्रीमियम भरावा लागणार आहे.
आंबेडकर स्वाधार योजनेला मंजूरी
राज्य मंत्रिमंडळाच्या ३ जानेवारी २०१७ रोजी पार पाडलेल्या बैठकीमध्ये अनुसूचीत जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी आंबेडकर स्वाधार योजनेला मंजूरी देण्यात आली आहे.
योजनेची वैशिष्ठ्ये