11 January 2017
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात नवीन लस
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोवर-रुबेला (MR) लसीचा सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये गोवर-रुबेला (MR) लस सुरू करण्यात येणार आहे.
- सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमामध्ये आधीपासूनच 10 आजारांवरील लसींचा समावेश असून त्यापैकी गोवर या आजारावर आधीपासूनच एक लस होती. गोवर-रुबेला (MR) लस या नवीन लसीमुळे आधीपासून असणारी गोवरची लस यादीतून काढून टाकण्यात येणार आहे.
- या सोबतच ‘pneumococcal pneumonia’ ही लस हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश व बिहारच्या काही भागात सुरू करण्यात येणार आहे.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम
- भारतात सन 1985 पासून सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, गोवर, हिपॅटायटीस ब, अतिसार, जपानी मेंदूला आलेली सूज आणि न्यूमोनिया या 10 अजरांसाठी लसीकरण केले जाते.
- लसीकरणापासून पूर्णतः वा अंशतः वंचित असलेली शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके व गरोदर माता यांचे 2020 पर्यंत पूर्णतः लसीकरण करण्यासाठी भारत सरकारने 25 डिसेंबर 2014 पासून ‘मिशन इंद्रधनुष्य’ या नावाने विशेष लसीकरण मोहिम सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरच्या गिफ्ट सिटीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रात भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय एक्सचेंज ‘India INX’ चे उद्घाटन केले आहे. ‘India INX’ ही मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
विद्यार्थ्यांसाठी स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण जाहीर करणारे गुजरात पहिले राज्य
गुजरात सरकारने देशातील पहिले विद्यार्थी स्टार्टअप आणि नाविन्यता धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यानी विकसित केलेल्या कल्पनांना 200 कोटी रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. दरवर्षी 1000 नविण्यातेला या अंतर्गत मदत करण्यात येणार आहे. 2015 मध्ये गुजरातने गुजरात औद्योगिक धोरणाचा भाग म्हणून स्टार्टअप मदत योजना सुरू केली होती. 2016 मध्ये गुजरातने माहिती तंत्रज्ञान स्टार्टअप धोरणाही जाहीर केले आहे