13 January 2017
व्हायब्रेट गुजरात' आंतरराष्ट्रीय परिषदेत दहावीत शिकणाऱ्या हर्षवर्धन (वय 14) या मुलाने "ड्रोन'ची निर्मिती केली असून, राज्य सरकारने त्याच्याशी पाच कोटींचा सहकार्य करार 12 जानेवारी 2017 रोजी केला. युद्धभूमीत पेरलेले भूसुरुंग शोधून नष्ट करण्यास मदत करणारा "ड्रोन' त्याने तयार केला आहे. याची व्यावसायिक पातळीवर निर्मिती करण्यासाठी गुजरात सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने हर्षवर्धनबरोबर पाच कोटी रुपयांचा करार केला आहे.
# अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष – श्रीपाद जोशी
# अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलांनासाठी राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांचे अनुदान मिळते
वेट फुट, ड्राय फुट धोरण बंद
क्यूबामधून अमेरिकेमध्ये स्थलांतर करून आलेल्या नागरिकांना एका वर्षानंतरच नागरिकत्व देण्याचे मागील वीस वर्षांपासून सुरू असलेले अमेरिकेचे धोरण अध्यक्ष बराक ओबामा यांनी थांबविले आहे. अमेरिकेमध्ये ‘वेट फूट, ड्राय फूट’ या नावाने हे धोरण राबविले जात होते.
इराणकडून भारतात विक्रमी तेल आयात
चौथा मोठा तेल पुरवठादार देश
2016 मध्ये 4.73 लाख बॅरल प्रतिदिनं आयात
स्पईसजेटने घेतली 205 विमाने
विमान प्रवासी कंपनी स्पईसजेटने बोइंग कंपांनीकडून 205 विमाने खरेदी करणार असून, दीड लाख कोटी रुपयाचा हा व्यवहार भारतातील हवाई क्षेत्रातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. नवीन विमाने 20% इंधन बचत करणारी. ‘बी 737’ ही विमाने खरेदी करणार
केण-बेटवा प्रकल्पास मंजूरी
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील बंदी उठवली
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना हटवल्यानंतर अखेर 13 जानेवारी 2017 रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेवरील (आयओए) बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तींना संघटनेवर पुन्हा स्थान दिल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने त्यावर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.