Current Affairs

9 January 2017

20 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद

  • राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेची 20 वी आवृत्ती नुकतीच विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे पार पडली.
  • ‘इंटरनेट ऑफ थिंग्स अँड ई-गव्हर्नन्स’ ही या वर्षीची थिम होती.
  • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग यांनी आंध्र प्रदेश शासनाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले होते.

व्होट व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रायल

  • सर्वोच्च न्यायालयाने 100% पारदर्शक मतदानाकरिता इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर व्होट व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रायलची (VVPAT) अमलबजावणी करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
  • भारतीय निवडणूक आयोगाला दुसर्‍यांदा सर्वोच्च न्यायालयाने असा निर्देश दिला आहे. यापूर्वी 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला असा निर्देश दिला होता.


काय आहे व्हीव्हीपीएटी?


एव्हीईएम मशीनच्या बाजूलाच ही प्रणाली बसविण्यात येते, आपलं मत नोंदवल्यानंतर बाजूला असलेल्या या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेलं मत 15 सेकंद दिसते. त्यानंतर मतदात्यानं नोंदवलेलं आणि कागदावर प्रिंट झालेलं हे मत प्रिंटरलाच जोडलेल्या एका बॉक्समध्ये पडते. ही मतं प्रिंट स्वरुपात चार वर्षापर्यंत ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. एखाद्या ‘ईव्हीएम’मशीनमध्ये खराबी आढळल्यास छापील स्वरुपात असलेले मतदान निकाल स्वरुपात वापरण्यात येतील. व्हीव्हीपीएटी ही प्रणाली प्रथम नोकसेन या नागालँडमधील मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत वापरली गेली होती आणि मिझोराम हे या प्रणालीचा वापर करण्यात येणारे पहिले राज्य ठरले आहे.


मनरेगा कामगारांसाठी आधार बंधनकारक

  • केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणार्‍या कामगारांना आधार कार्ड बंधनकारक केले आहे.
  • यासाठी सरकारने आधार (आर्थिक आणि इतर अनुदान, लाभ आणि सेवा यांचे लक्षित वितरण) कायदा 2016 च्या कलम 7 चा आधार घेतला आहे.
  • आधार कायदा 2016 च्या कलम 7 नुसार केंद्र शासनाला भारताच्या संचित निधीतून दिल्या जाणार्‍या लाभ, सेवा, अनुदान यासाठी नागरिकांच्या आधार ओळखपत्राची मागणी करण्याचा अधिकार आहे.
  • हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे अनुडांनातील गळती थांबविणे आणि योग्य निधी योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे हा आहे.

स्वदेशी तोफ धनुषची चाचणी

भारतीय लष्कराने स्वदेशी प्रगत तोफ असलेल्या धनुषची यशस्वी चाचणी हिमालयमध्ये घेतली आहे. धनुष 155 एमएम/52 ही तोफ बोफोर्स एफएच-77बी/39 वर आधारित असून स्वीडिश कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण करारानुसार त्याचा विकास करण्यात आला आहे. धनुषचा विकास DRDO ने खाजगी कंपन्यांच्या सहकार्याने केला आहे. धनुषचा पल्ला 45 किमी आहे.

प्रवासी कौशल्य विकास योजना

परदेशात नौकारी मिळविण्यासाठी धडपडत असणार्‍या युवकांना लक्ष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कौशल्य कॅपिटल बनविण्याच्या उद्देशाने प्रवासी कौशल्य विकास योजना सुरू केली आहे.

बंगळुरु येथे पार पाडलेल्या 14 व्या प्रवासी भारतीय दिनी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. (14 व्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे पोर्तुगालच

;