7 January 2017
भारत पोर्तुगालमध्ये तीन करार
भारत आणि पोर्तुगालदरम्यान सहा सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये पुढील करारांचा समावेश आहे:
- संरक्षण
- पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा
- सागरी संशोधन आणि संसाधने
- कृषी आणि संलग्न क्षेत्र
- माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स
- लिस्बन विद्यापीठात आयसीसीआरचे अध्ययन केंद्र स्थापन करणे
राहील शरीफ इस्लामिक मिलिटरी अलायन्सच्या प्रमुखपदी
- पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख राहील शरीफ यांची इस्लामिक मिलिटरी अलायन्सच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. इस्लामिक मिलिटरी अलायन्स ही सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करी युती असून 39 देश सध्या त्याचे सदस्य आहेत.
- राहील शरीफ हे नोव्हेंबर 2016 मध्ये पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख पदावरून निवृत झाले असून त्यांची जागा जनरल कमर जावेद बाज्वा यांनी घेतली आहे.
काय आहे इस्लामिक मिलिटरी अलायन्स ?
- दहशतवादाशी लढा देण्यासाठी इस्लामिक मिलिटरी अलायन्सची स्थापना झाली असून 39 देश सध्या सदस्य आहेत.
- डिसेंबर 2015 मध्ये या अलायन्सची स्थापना सौदी अरेबियाने केली आहे.
- सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे या अलायन्सचे कमांड सेंटर आहे.
- इस्लामिक सहकार संघटनेचे (OIC) तत्त्व आणि उद्देशांच्या अनुरोधाने या युतीची स्थापना झाली.
- इराक, लिबिया, सिरिया, अफगाणिस्तान आणि इजिप्त मधील दहशतवादाविरोधाच्या लष्करी कार्यवाहिला सदस्य देश मदत करतात.
- पाकिस्तान, इजिप्त, येमेन, बांग्लादेश यांसारखे देश या युतीचे सदसी असून विशेष म्हणजे इराण या युतीचा सदस्य नाही.
14 वा प्रवासी भारतीय दिन
- प्रवासी भारतीय दिनाची 14 वी आवृत्ती भारताचे माहिती तंत्रज्ञान हब असलेल्या बेंगूळुरू (कर्नाटक) येथे पार पडली.
- 2017 ची थीम : ‘Redefining Engagement with the Indian Diaspora’